
Poddar Pigment Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत होती, मात्र आज हा स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के घसरणीसह 272.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. केमिकल क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीचा विषय :
‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीखची घोषणा करणार आहे. ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2022 साठी कंपनीने अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून 17 मार्च 2023 हा दिवसा निश्चित केला आहे. 14 मार्च 2023 रोजी होणाऱ्या बैठकीत संचालक त्याची घोषणा करतील.
सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के घसरणीसह 272.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 4.51 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने 5 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 83.69 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 2.17 टक्के नकारात्मक परतावा दिला होता. 21 जून 2022 रोजी ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने 231 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 338.30 रुपये होती. ‘पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 291.56 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.