
Yes Bank Share Price | येस बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने ‘कर्मचारी स्टॉक ऑप्शन स्कीम’ म्हणजेच ESOS द्वारे 1,66,100 इक्विटी शेअर्स वाटप केले आहे. ही बातमी येताच येस बँकेचा स्टॉक शुक्रवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी 1 टक्क्यांच्या वाढीसह 15.85 रुपयांवर पोहचला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 0.87 टक्के वाढीसह 15.02 रुपयांवर क्लोज (Today Yes Bank Share Price) झाला होता. ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम’ अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना एका विशेष प्रक्रिये अंतर्गत कंपनीचे शेअर्स खरेदी (Yes Bank Share Price Target 2030) करण्याची संधी देतात. या अंतर्गत कर्मचाऱ्याना कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यात प्राधान्य देण्यात येते. (Yes Bank Limited)
येस बँक टार्गेट प्राईस :
‘BASAV कॅपिटल’ फर्मच्या तज्ञांनी येस बँक स्टॉक पुढील काळात 160 रुपये किंमतीवर जाऊ शकतात,असा अंदाज व्यक्त केला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी येस बँकेचा स्टॉकमधील चढ उतराबाबत काळजी करू नये. येस बँकेचे शेअर्स पुढील तीन ते चार वर्षांत 55 ते 60 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकदार येस बँकेचे शेअर्स खरेदी करून मजबूत परतावा कमवू शकतात, कारण सध्या हा स्टॉक अत्यल्प किमतीवर उपलब्ध आहे.
दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिके संदर्भात आरबीआय आणि सेबीकडून उत्तर मागवले आहे, ज्यात येस बँकेने ‘जेसी फ्लॉवर्स अॅसेट्स रिकन्स्ट्रक्शन’ कंपनीला 48,000 कोटी रुपयांच्या NPA मालमत्ता पोर्टफोलिओचे हस्तांतरणाच्या प्रकरण केले आहे. या जनहित याचिकेत येस बँकेच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची विनंती करण्यात आली आहे.
लीगल मॅटर कोर्टात :
राज्यसभेचे माजी सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्या दाखल केल्या याचिकेत केंद्रीय वित्त मंत्रालय, आरबीआय आणि सेबी यांना भविष्यातील अशा कोणत्याही NPA ट्रान्स्फर संबंधित करार / व्यवहाराची चौकशी करण्याची विनंती केली आहे. आणि बँकांना / गैर- बँकिंग किंवा इतर वित्तीय संस्था आणि मालमत्ता पुनर्रचना कंपन्या यांच्यातील अंतर्गत करारांचे नियमन करण्यासाठी स्थापन केल्या जाणाऱ्या समितीच्या शिफारशींनुसार सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश जारी करावे असे आवाहन देखील केले आहे.
सरन्यायाधीश सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने अन्य पक्षांना चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. खंडपीठाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 17 जुलै 2023 ही तारीख दिली आहे. खंडपीठाने अद्याप औपचारिक नोटीस जारी केली नाही आहे. याशिवाय कोर्टाने ‘येस बँक लिमिटेड’ आणि ‘जेसी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ यांना निश्चित कालावधीत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. (Yes Bank Share Price Target 2025)
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.