
Magellanic Cloud Share Price | ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ या डिजिटल स्पेस सेक्टर संबंधित स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीने वाढत आहेत. ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 0.023 टक्के घसरणीसह 646.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 648.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 270.50 रुपये होती. (Magellanic Cloud Ltd)
बोनस शेअर्सची घोषणा :
‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे कंपनी प्रत्येकी 1 इक्विटी शेअर्सवर गुंतवणूकदारांना प्रत्येकी 3 मोफत इक्विटी शेअर वाटप करणार आहे. ‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीने बोनस शेअर्सच्या वितरणासाठी 22 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
‘मॅगेलॅनिक क्लाउड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1,187.61 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2,026.67 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीचे शेअर्स 61.51 टक्के आणि YTD आधारावर 38 टक्के वधारले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.