15 May 2021 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

टाटा समूहाला धक्का, सायरस मिस्त्री पुन्हा समूहाचे अध्यक्ष होणार

Ratan Tata, Tata Group, Cyrus Mistry

नवी दिल्ली: राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलएटी) सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पुन्हा एकदा टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय चुकीचा होता असं राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने म्हटलं आहे. सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदावरुन हटवण्याच्या निर्णय़ाविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने धाव घेतली होती. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने जुलै महिन्यात निर्णय सुरक्षित ठेवला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रतन टाटा यांच्यानंतर टाटा कंपनीच्या चेअरमन पदाची धुरा हाती घेणाऱ्या मिस्त्री यांची 3 वर्षांपूर्वी २४ ऑक्टोबर २०१६ रोजी चेअरमनपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. या विरोधात सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे दाद मागितली होती. त्यावर सुनावणी करताना यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाने मिस्त्री यांची हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला.

सायरस मिस्त्री यांची २४ ऑक्‍टोबर २०१६ रोजी टाटा समूहातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. टाटा समूहातील सुशासनाचा आग्रह धरणाऱ्या मिस्त्री यांनी विश्‍वस्तांच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केले होते. मिस्त्री यांच्या जागी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठली होती. दोन्ही बाजुंनी न्यायालयात आणि कंपनी कायदा लवादाकडे दाद मागण्यात आली. या संघर्षात कधी मिस्त्री तर कधी टाटा समूहाची सरशी झाली, परंतु मागील वर्षभरापासून हे प्रकरण कंपनी कायदा लवादाकडे प्रलंबित होते.

 

Web Title:  Cyrus Mistry was Expulsion Illegal from TATA Group Chairman Position.

हॅशटॅग्स

#india(201)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x