6 May 2024 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांचा खास शेअर 52 टक्के स्वस्त झालाय, खरेदी करून कमाईची संधी सोडू नका

Nazara Technologies Share Price

Nazara Technologies Share Price | राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 75 टक्के स्वस्त झाले आहेत. हा स्टॉक आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 52 टक्के घसरला आहे. आपण ज्या स्टॉकबद्दल बोलतोय त्याचे नाव आहे, ‘नजारा टेक्नॉलॉजी’. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजने पुढील काळात ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 44 टक्के वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे 65,88,620 शेअर्स सामील आहेत, ज्याचे एकूण प्रमाण 10 टक्के आहे. (Nazara Technologies Limited)

शेअरमध्ये मजबूत घसरण :
2 वर्षांपूर्वी म्हणजेच 30 मार्च 2021 रोजी ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 1101 रुपये होती, आणि स्टॉक 1971 रुपयांवर सूचिबद्ध झाला होता. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 505.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स IPO किंमतीच्या तुलनेत 52 टक्के कमजोर झाले आहेत. तर उच्चांक किमतीवरून हा स्टॉक 75 टक्के कमजोर झाला आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 50 टक्के नुकसान झालं आहे.

शेअरची लक्ष किंमत :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरवर 700 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 486 रुपयांच्या किंमतीनुसार हा स्टॉक पुढील काळात 44 टक्के वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या माहिती नुसार ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीमध्ये मजबूत महसूल वाढ अपेक्षित आहे, विशेषत: एस्पर्टमधील नफ्यात वाढ झाल्यामुळे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, हा स्टॉक पुढील काळात जबरदस्त परतावा कमावून देऊ शकतो. सध्याच्या बाजारभावानुसार ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 45 पट PE वर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्मचा अंदाज :
आर्थिक वर्ष 2024 मध्ये 37 टक्के YoY महसूल वाढ, eSports मध्ये 45 टक्के YoY वाढ आणि GEL मध्ये 25 टक्के YoY वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 20024 मध्ये कंपनीचा EBITDA 86 टक्के वाढेल. ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचा EBITDA मार्जिन वार्षिक 250bps ने सुधारण्याची शक्यता आहे. कंपनीच्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून कंपनीकडे 660 कोटी कॅश इन हॅण्ड आहे. तज्ज्ञांच्या मते बुल केसमध्ये ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 800 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, आणि मंदीमध्ये हा स्टॉक 400 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nazara Technologies Share Price 543280 on 22 March 2023.

हॅशटॅग्स

#Nazara Technologies Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x