
Tata Power Share Price | आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमधे भारतीय शेअर बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली. टाटा समूहाचा भाग असेलल्या ‘टाटा पॉवर’ कंपनीचे शेअर्स अक्षरशः नीचांक किंमत पातळी तोडून खाली घसरले. शुक्रवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी ‘टाटा पॉवर’ कंपनीचे शेअर्स 3.60 टक्के घसरणीसह 192.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला आहे. 20 जून 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर 190 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता मात्र टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी दबाव पाहायला मिळू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. (Tata Power Limited)
टाटा पॉवर स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी ‘टाटा पॉवर’ कंपनीचे शेअर्स 180-175 रुपयांपर्यंत घसरू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. या स्टॉक पुढील काळात 175 रुपयांवर सपोर्ट लेव्हल बनवू शकतो, असे तज्ञ म्हणतात. याचा अर्थ शेअरची किंमत आणखी 15 रुपये खाली येऊ शकतो. अलीकडेच टाटा पॉवर कंपनीच्या उपकंपनी ‘टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी’ ला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून सोलापूर येथे 200 MW चा सोलर PV प्रकल्प उभारण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड इश्यू करण्यात आला आहे. टाटा पॉवर कंपनीला हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास 432.9 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईडची वार्षिक घट होईल असा अंदाज आहे.
डिसेंबर तिमाहीची कामगिरी :
डिसेंबर 2022 तिमाहीत ‘टाटा पॉवर’ कंपनीने 121.9 टक्के वाढीसह 945.02 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याचवेळी मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 425.81 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ विक्रीमध्ये वार्षिक 29.5 टक्के वाढ झाली असून एकूण सेल्स 14,129.12 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.