 
						Delhivery Share Price | आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनाक 31 मार्च 2023 रोजी आर्थिक वर्ष 2022-23 ची समाप्ती झाली. आणि या दिवशी शेअर बाजारात कमालीची तेजीत पाहायला मिळाली. दरम्यान भारतातील दिग्गज लॉजिस्टिक कंपनी ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ च्या शेअरमध्ये मजबूत खरेदी सुरू होती. ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 343.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या शेअर बाजारातील अनेक तज्ञ जा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. (Delhivery Limited)
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ कंपनीने 5.8 टक्के अधिक महसूल संकलित केला आहे. मात्र वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 6.8 टक्के घट झाली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ कंपनीचा EBITDA सकारात्मक होऊ शकतो, आणि ही बाब कंपनीसाठी सकारात्मक ट्रिगर म्हणून सिद्ध होऊ शकते.
शेअरची लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज फर्मने ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर 425 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. यासोबत ब्रोकरेज फर्मने स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतो.
‘डेल्हीवेरी लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ मे 2022 शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मधे शेअरची इश्यू किमत 462-487 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. या कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत 708.45 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 292 रुपये होती. ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या 52 टक्के खालच्या किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		