
Sarkari Bank Shares | 2022-23 हा आर्थिक वर्ष शेअर बाजारासाठी निराशाजनक होता, मात्र या काळात PSU बँकानी कमालीची कामगिरी केली. सार्वजनिक क्षेत्रातील 5 बँकांच्या शेअरनी आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा देऊन मालामाल केले आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात PSU बँक निर्देशांक 30 टक्के वाढला होता. याकाळात गुंतवणूकदारांनी मजबूत नफा कमावला आहे. चला तर मग जाणून घेऊ या 5 बँक स्टॉकबद्दल.
युको बँक :
2022-23 या आर्थिक वर्षात युको बँकेचे शेअर्स 12 रुपयांवरून वाढून 26.05 रुपयांवर पोहचले होते. म्हणजेच 2022-23 या आर्थिक वर्षात युको बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत युको बँकेच्या शेअरची किंमत 11.50 रुपयेवरून वाढून 26.05 रुपयांपर्यंत गेली होती. 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 7.20 टक्के वाढीसह 26.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
इंडियन बँक :
नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात इंडियन बँकेचे शेअर्स कमालीचे वाढले आहेत. 3 एप्रिल 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यांत इंडियन बँकेच्या शेअरने आपल्या स्थितीतील गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.
यूनियन बैंक ऑफ इंडिया :
मागील आर्थिक वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली होती. 2022-23 या आर्थिक वर्षात ‘युनियन बँक’ च्या शेअरची किंमत 65 टक्क्यांनी वधारली होती. मागील सहा महिन्यात या बँकेचा शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 46.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 290.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
बँक ऑफ इंडिया :
मागील आर्थिक वर्षात ‘बँक ऑफ इंडिया’ च्या शेअरची किंमत 49 रुपयेवरून वाढून 76.00 रुपयेवर गेली आहे. मागील 12 महिन्यांत या PSU बँकेच्या शेअरने आपल्या गुणूकदारांना 54.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना मागील 6 महिन्यात 58.33 टक्के परतावा मिळाला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 76.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
पंजाब अँड सिंध बँक :
या PSU बँकेच्या शेअरची किंमत 16 रुपयेवरून वाढून 26.70 रुपये पर्यंत पोहचली आहे. म्हणजेच 2022-23 या आर्थिक वर्षात या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 4.09 टक्के वाढीसह 26.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.