11 May 2024 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
x

NCC Share Price | झुनझुनवालांच्या पसंतीच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉक उच्चांक किंमतीजवळ ट्रेड करतोय, खरेदी केल्यास मजबूत परतावा

NCC Share Price

NCC Share Price | ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीला मार्च 2023 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून 1,919 कोटी रुपये मूल्याचे पाच नवीन ऑर्डर प्राप्त झाले. या नंतर कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची खरेदी वाढली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 108.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 105.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (NCC Limited)

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 64.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरूवातीपासून ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने 27.29 टक्के परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 12.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीचे बाजार भांडवल 6,721 कोटी रुपये आहे. 21 जून 2022 रोजी ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 51 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

झुनझुनवाला कुटुंबाची गुंतवणूक :
शेअर बाजारात बिग बूल म्हणून प्रसिद्ध दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांनी डिसेंबर 2022 तिमाहीत ‘NCC लिमिटेड’ कंपनीमध्ये आपली गुंतवणुक वाढवली होती. सप्टेंबर 2022 तिमाहीत एनसीसी कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 12.64 टक्के भाग भांडवल होते. त्यांनी आपली गुंतवणुक वाढवली असून आता त्यांच्याकडे 13.09 टक्के भाग भांडवल आहे. या एकूण भाग भांडवलात राकेश झुनझुनवाला यांच्याकडे असलेल्या एनसीसी कंपनीच्या शेअर्सही सामील आहेत.

रेखा झुनझुनवाला मागील तिमाहीत 28,47,666 अतिरीक्त एनसीसी कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, ज्याचे कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या तुलनेत प्रमाण 0.45 टक्के आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2022 तिमाहीत एनसीसी कंपनीचे 13.09 टक्के भाग भांडवल आहेत, म्हणजेच त्यांच्याकडे 8,21,80,932 शेअर्स आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 7,9,333266 शेअर्स म्हणजेच 12.64 टक्के भाग भांडवल होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NCC Share Price on o5 April 2023.

हॅशटॅग्स

#NCC Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x