4 May 2025 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

Viral Video | स्कुटीवर दोन महिला आणि चिमुकला, भटक्या कुत्र्यांनी केला असा पाठलाग, घडला प्रकार कॅमेऱ्यात कैद

Viral Video

Viral Video | दुचाकी चालवताना अनेकदा त्यामागे भटके कुत्रे धावतात. असं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल किंवा अनुभवलं देखील असेल. अशाच प्रकारे भटके कुत्रे मागे पळत सुटल्याने एक मोठी घटना घडली आहे. यामध्ये तीन व्यक्तींचा मोठा अपघात झालाय. अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेकदा कोणी एकटं असेल तेव्हा देखील रस्त्यावरील भटके कुत्रे त्या व्यक्तीवर हल्ला चढवतात. या घटनेत अनेक व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे. अशात दुचाकी मागे कुत्रे पळत असल्याने तीन महिलांचा अपघात झालाय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन महिला आणि एक लहान मुलगी दुचाकीवर बसून जात आहे. तितक्यात कुत्र्यांचं एक मोठं टोळकं त्यांच्या मागे लागतं. कुत्रे मागे लागल्याने स्कूटी चालवत असलेली महिला थोडी घाबरते. तिचं दुचाकीवरून लक्ष विचलित होतं आणि समोर उभ्या असलेल्या एका कारला तिची दुचाकी धडकते.

दुचाकी धडकल्याने दोन महिला आणि एक लहान मुलगी हवेत फेकल्या जातात आणि खाली पडतात. हा अपघात पाहून मागे पळत असलेली कुत्र्यांची टोळी पुन्हा मागे पळून जाते. 25 सेकंदाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.

सुदैवाने या घटनेत महिला बाचवल्या आहेत. अपघातात त्यांना थोडी जखम झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सादर घटना ही ओडिसा येथील आहे. बरहामपूर शहरात ही घटना घडली आहे. हा व्हिडिओ पाहून भटक्या कुत्र्यांची किती मोठी समस्या झाली आहे हे समजते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video trending on woman riding a Scooty fear of stray dogs hit a car check details on 06 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या