 
						NBCC India Share Price | ‘एनबीसीसी इंडिया’ या ‘केंद्रीय शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालय’ च्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची चर्चा शेअर बाजार जोर धरू लागली आहे. ‘एनबीसीसी इंडिया’ या कंपनीला केंदिरी गृह मंत्रालयाच्या सीमा व्यवस्थापन विभागाकडून 448.02 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही बातमी येताच कंपनीचे शेअर्स सकारात्मक वाढीसह ट्रेड करु लागले. मिझोरममधील भारत-बांगलादेश सीमेजवळ 88.58 किमी लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी ‘एनबीसीसी इंडिया’ कंपनीला ऑर्डर देण्यात आली आहे. एनबीसीसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,430 हजार कोटी रुपये आहे. 3 एप्रिल रोजी ‘एनबीसीसी इंडिया’ कंपनीचे शेअर्स 35.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1.89 टक्के वाढीसह 37.65 रुपये किमतीवर क्लोज झाले. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक किंमत पातळी 43.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 26.55 रुपये होती. (NBCC India Limited)
सध्या ‘एनबीसीसी इंडिया’ कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीपेक्षा 34.27 टक्के वर ट्रेड करत आहे. एनबीसीसी कंपनीचे NSE इंडेक्सवर एप्रिल 2012 साली सूचीबद्ध करण्यात आले होते. सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 465 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसांत हा स्टॉक 16.93 टक्के वाढला आहे. तर मागील एका महिन्यात ‘एनबीसीसी इंडिया’ कंपनीचे शेअर्स 3.86 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7.49 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
एनबीसीसी ही कंपनी मुख्यतः तीन व्यवसाय विभागांमध्ये काम करते. प्रथम प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, ज्यामध्ये सरकारी मालमत्तांचा पुनर्विकास केला जातो. दुसरा विभाग म्हणजे अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम यांचा समावेश होतो. तिसरा विभाग म्हणजे रिअल इस्टेट विकास. डिसेंबर 2022 तिमाहीत एनबीसीसी कंपनीचा निव्वळ नफा 10 टक्के घसरणीसह 87.03 कोटी रुपयांवर आला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत एनबीसीसी कंपनीने 96.98 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		