
Sugar Company Shares | भारतीय शेअर बाजारात साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर साखर कंपन्यांचा इंट्रा डे उच्चांक 9 टक्केवर पोहचला होता. एका सकारात्मक निर्णयामुळे साखर कंपन्यांच्या शेअर्सने ही उसळी घेतली आहे. शुद्ध साखरेच्या किमतीत झालेली वाढ आणि 2025 पर्यंत इथेनॉलचा वापर दुप्पट करण्याचे लक्ष भारत सरकारने जाहीर करताच साखर कंपन्यांच्या शेअर्सने उसळी घेतली. सरकारच्या या नवीन घोषणेचा फायदा साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे.
साखर कंपन्यांच्या शेअरची कामगिरी :
‘बलरामपूर चिनी’ कंपनीच्या शेअरची किंमत 3.3 टक्क्यांच्या वाढीसह 422.70 रुपयेवर क्लोज झाली होती. या कंपनीचे शेअर्स मे 2022 महिन्यानंतरच्या सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचले आहेत. यसोबत ‘त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज’, ‘दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज’, ‘श्री रेणुका शुगर्स’, ‘धामपूर शुगर मिल्स’, ‘द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज’ या कंपनी शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. याशिवाय ‘मगध शुगर अँड एनर्जी’ कंपनीच्या शेअरची किंमत 9 टक्क्यांनी तर ‘अवध शुगर अँड एनर्जी’ कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्क्यांनी वाढली होती.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या 6 महिन्यांत साखर उत्पादन काही प्रमाण 3 टक्क्यांनी घसरून 29.9 दशलक्ष टन नोंदवले गेले होते. ISMA डेटानुसार मागील आर्थिक वर्षात पहिल्या 6 महिन्यांत साखरेचे एकूण उत्पादन 30.0 दशलक्ष टन नोंदवले गेले होते. साखर क्षेत्रातील कंपन्याच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार 2022-23 मध्ये ISMA चे उत्पादन 34 दशलक्ष टन पर्यंत गेले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.