
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअरमध्ये अद्भूत उसळी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञ ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या स्टॉकवर उत्साही आहेत. पुढील काळात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 525 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 7.76 टक्के वाढीसह 471.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने शेअर बाजार बंद होता. 17 ऑगस्ट 2022 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 494.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची सर्वोच्च किंमत पातळी 494.40 रुपये होती. 12 मे 2022 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 366.20 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Tata Motors Limited)
तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल आपल्या संशोधन अहवालात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरवर 525 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. यासोबतच ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते पुढील आठवड्यात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 480 रुपये पर्यंत वाढू शकतात.
टाटा मोटर्स कंपनीची देशांतर्गत बाजारपेठेत घाऊक विक्री मार्च 2023 मध्ये तीन टक्क्यांनी वाढली असून 89,351 युनिट्सवर पोहोचली आहे. मागील महिन्यात टाटा मोटर्स कंपनीने देशांतर्गत बाजारात 44044 प्रवासी वाहने विकली आहेत. मार्च 2023 मध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या व्यावसायिक वाहनांची विक्री 47,050 वाहनांच्या तुलनेत किरकोळ घटून 46,823 वाहनांवर आली आहे. त्याच वेळी 2022-23 या आर्थिक वर्षात टाटा मोटर्स कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री 9,31,957 युनिट्सवर पोहोचली होती. हे प्रमाण मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत 35 टक्के जास्त आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.