6 May 2024 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

Schaeffler India Share Price | मालामाल करणारा शेअर! 188 टक्के परतावा प्लस डिव्हीडंड जाहीर, फायदा घेण्यापूर्वी स्टॉक डिटेल्स पहा

Schaeffler India Share Price

Schaeffler India Share Price | ‘शेफलर इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स या आठवड्यात एक्स डिव्हिडंडवर ट्रेड करणार आहेत. ‘शेफलर इंडिया लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 24 रुपये प्रति शेअर म्हणजेच 1200 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. आणि शेअर 11 एप्रिल 2023 रोजी एक्स डिव्हिडंडवर ट्रेड करणार आहे. गुंतवणूकदारांना लाभांश 18 मे 2023 रोजी वाटप केला जाईल. सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी ‘शेफलर इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के घसरणीसह 3,030 रकाये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपन्याद्वारे वाटप करण्यात येणारा लाभांश हा अनेक शेअर धारकांसाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत असतो. (Schaeffler India Limited)

‘शेफलर इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स YTD आधारे 11.71 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 50.36 टक्के वाढले आहेत. मागील पाच वर्षात ‘शेफलर इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 188.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुरूवातीपासून आता पर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47,509.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘शेफलर इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3,968.75 रुपये होती. ‘शेफलर इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1,921.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 47,578.84 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीमध्ये प्रवर्तक शेअरहोल्डिंग 74.13 टक्के आहे. FII चा वाटा 4.81 टक्के आणि DII चा वाटा 15.04 टक्के आणि सार्वजनिक होल्डिंग 6.02 टक्के आहे.

कंपनीचे आर्थिक तिमाही परिणाम :
डिसेंबर 2022 तिमाहीत ‘शेफलर इंडिया लिमिटेड’ कंपनीने 1794.65 कोटी रुपये कमाई केली होती. एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत ‘शेफलर इंडिया लिमिटेड’ कंपनीने 1523.20 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. एका वर्षात कंपनीचा महसूल 17.8 टक्के वाढला आहे. तर वार्षिक आधारावर डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 16.71 टक्के वाढून 1,503.35 कोटीवर पोहचला आहे. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने 230.98 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने 190.64 कोटी निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच एका वर्षात कंपनीच्या निव्वळ नफ्यात 21.2 टक्के वाढ झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Schaeffler India Share Price on 10 April 2023.

हॅशटॅग्स

Schaeffler India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x