
Apollo Micro Systems Share Price | ‘अपोलो मायक्रो सिस्टीम्स’ या कॅपिटल गुड्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपले शेअर्स विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अपोलो मायक्रो सिस्टीम्स’ कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीखही जाहीर केली आहे. ‘अपोलो मायक्रो सिस्टीम्स’ कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीच्या संचालक मंडळाने 4 मे 2023 हा दिवस स्टॉक स्प्लिटसाठी रकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कंपनी आपले प्रत्येक शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. 28 मार्च 2023 रोजी कंपनीने स्टॉक स्प्लिट चा प्रस्ताव मजूर केला होता. (Apollo Micro Systems Limited)
कंपनीची आर्थिक कामगिरी :
कंपन्या स्टॉक विभाजनाद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. कंपनी स्टॉक स्प्लिटमध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी करत नाही. फक्त विद्यमान शेअर्सचे तुकडे केले जातात. डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत ‘अपोलो मायक्रो सिस्टीम्स’ कंपनीने 82.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एका वर्षापूर्वी या कंपनीचे निव्वळ उत्पन्न 64.84 कोटी रुपये होते, तर मागील डिसेंबर तिमाहीत कंपनीने 67.19 कोटी रुपये व्यापारी खर्च केला होता. एका वर्षांपूर्वी याच तिमाहीत कंपनीचा खर्च 55.04 कोटी रुपयेवर गेला होता. याच तिमाहीत कंपनीने 6.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
शेअर कामगिरी :
सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी ‘अपोलो गायको सिस्टम्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 301.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 97.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या स्टॉकने लोकांना 70.15 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 23 जानेवारी 2023 रोजी ‘अपोलो मायक्रो सिस्टीम्स’ कंपनीच्या शेअरने 379.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 26 मे 2022 रोजी हा स्टॉक 109.20 रुपये या आपल्या 52 आठवडयांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.