5 May 2024 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

गाईंचा वापर धार्मिक राजकारणासाठी? सरकारी निधी अभावी रत्नागिरी खेडमध्ये 100 हुन अधिक गाईंची प्रकृती गंभीर, 12 गाईंचा उपासमारीने मृत्यू

Konkan Ratnagiri

CM Eknath Shinde | उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील अंतर्गत कलह महाराष्ट्रात दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत असताना, औरंगाबाद येथे महाविकास आघडीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिंदे आणि भाजप समर्थकांनी गोमूत्राची फवारणी केली होती. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांनी लोकांच्या मूळ प्रश्नांपेक्षा धर्माच्या विषयांना अधिक बळ दिल्याचं अनेकदा पाहायला मिळतंय. मात्र हिंदूं धर्मातील संबंधित विषयात शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नसल्याचं दिसतंय. त्याचं ज्वलंत उदाहरण ठरलंय ते रत्नागिरीतील खेड हे ठिकाण.

१०० हुन अधिक गाईंची प्रकृती गंभीर, तर 12 हुन अधिक गाईंचा उपासमारीने मृत्यू
कोकण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील गो शाळेत सध्या १००० पेक्षा अधिक गाई आहेत. परंतु शिंदे-फडणवीस सरकारच्या शासनाकडून उर्वरित निधी उपलब्ध न झाल्याने तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोटे येथील संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थेच्या या गो शाळेत चाऱ्या अभावी १०० हुन अधिक गाईंची प्रकृती ढासळली आहे. तर गेल्या महिना भरात 12 हुन अधिक गाईंचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. या गो शाळेचे संचालक व जेष्ठ कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांनी आजपासून गो शाळेमध्येच आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. कीर्तनाच्या मिळालेल्या पैशातून गाईंसाठी व त्यांना जगवण्यासाठी भगवान कोकरे महाराज यांची धडपड सुरु आहे.

जिल्ह्यातली पहिली मोठी गो शाळा
सण 2008 साली कसायाकडे जाणाऱ्या गाईंना वाचवण्यासाठी तसेच महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गाईंना आसरा देण्यासाठी एका आश्रमाची स्थापना करण्यात आली. गाईंची सेवा करण्यासाठी जेष्ठ कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांनी संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्ती धाम सेवा संस्था स्थापन केली. त्याठिकाणी जिल्ह्यातली पहिली मोठी गो शाळा स्थापन केली.

खर्च करणं अवघड
परंतु, या गाईंची संख्या हजारो असल्याने त्यांना देखील सर गाईंना पोसणे आता शक्य होत नाही . या संधर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील दिले असून शासनाकडून उर्वरित अनिधि मिळावा व गो शाळेसमंधी इतर अडचणी सोडवाव्यात या मागणी साठी या गो शाळेतच भगवान कोकरे महाराज यांनी आजपासून उपोषण सुरु केले आहे.

वर्ष २०१८ – फडणवीस सरकारनेही केलं होतं दुर्लक्ष
त्यावेळी गायींच्या रक्षणासाठी ४० बाय १५० फुटाची शेड बांधण्याचे काम सुरु होतं. त्यासाठी ३५ लाख रुपये खर्च येणार होता. त्यावेळीही राज्य शासनाने मंजूर केलेल्या अनुदानापैकी १ रुपयाही मिळालेला नव्हता. तर दुसरीकडे दानशूर व्यक्तींनीही आता शासनाकडून निधी मिळणार म्हणून हात आखडता घेतला होता. तोच पाढा शिंदे सरकार पुढे वाचतंय असं स्पष्ट होतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Konkan Ratnagiri 12 cows die due to food shortage check details on 11 April 2023.

हॅशटॅग्स

#Konkan Ratnagiri(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x