7 May 2025 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

श्रीलंकेतील कोलंबोमध्ये ८ बॉम्बस्फोट, २०७ जणांचा मृत्यू

Bomb Blast

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तब्बल ८ ठिकाणी एकामागे एक साखळी बॉम्बस्फोट झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील ३ बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. परंतु, त्यानंतर आता आणखी २ बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. ७व्या बॉम्बस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८व्या बॉम्बस्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी ७ जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

श्रीलंकेत संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोलंबो येथे झालेल्या स्फोटांमुळे इंटरनेट सेवा सर्वत्र बंद करण्यात आली आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून ४५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (२१ एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.४५ वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या