27 June 2022 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
रविवारी कोर्ट बंद असतं | संध्याकाळी 6.30 वाजता शिंदे गटाची केस सुप्रीम कोर्टात | 7.30 ठरलं उद्या सुनावणी | नेटिझन्सच्या दिलासा चर्चा Multibagger Stocks | छोटे शेअर्स वेगात | या 13 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात तब्बल 1481 टक्के परतावा दिला Mutual Fund SIP | महीना 1000 रुपयांच्या एसआयपीने तुम्हाला 32 लाख रुपये मिळतील | अधिक जाणून घ्या Eknath Shinde | शिंदे गटाला 'दिलासा' मिळावा म्हणून थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे? Horoscope Today | 27 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Diabetes Symptoms | मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो | ही प्राथमिक लक्षणे तुम्हाला आहेत का खात्री करा Multibagger Stocks | हा 39 रुपयांचा शेअर तुमच्यकडे आहे? | फक्त 21 दिवसात 164 टक्के परतावा दिला
x

'माऊ' म्हणजे मांजर नाही तर 'माननीय उद्धव ठाकरे': हितेंद्र ठाकूर

Hitendra Thakur, Shivsena, Udhav Thackeray

पालघर : पालघर पोटनिवडणुकी दरम्यानच्या स्वपक्षीय तसेच मित्रपक्षांच्या कार्यपद्धतीवर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्याच्यासमोरच शाळा घेत खंत व्यक्त केली. तसेच त्यांच्यासमोरच तुम्ही विकले गेला होतात की नाही असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, जर मित्रपक्षांची लायकी होती तर मतं कमी पडली असा प्रश्न देखील त्यांच्यासमोरच विचारला.

मात्र हे सर्व जुने दाखले देताना आता या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आहोत असं देखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना देखील लक्ष केलं आणि म्हणाले की उद्धव ठाकरे पालघरच्या दौऱ्यावर येतात आणि बोलतात आम्ही गुंड म्हणून आहोत, पण बाळासाहेब म्हणायचे की गुंड चालेल पण षंड नको. मग मी गुंड आहे असे देखील आमदार ठाकूर यावेळी म्हणाले. पुढे शिवसेनेवर टीका करताना आमदार ठाकूर म्हणाले की शिवसेनेमधील जोश संपला आहे. वनगा कुटुंबाची वाट देखील शिवसेनेने लावली आणि आधी त्यांच्या मुलाला गाजर दाखवलं. त्यामुळे ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही असं ही ते म्हणाले. तसेच काही नेते केवळ दाढी वाढवून आनंद दिघे बनण्याचा प्रयत्न करत आहेत असा अप्रत्यक्ष टोला एकनाथ शिंदे यांना लगावला. पुढे उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवताना ते म्हणाले की ‘माऊ’ म्हणजे मांजर नाही तर ‘माननीय उद्धव ठाकरे’ असा सणसणीत टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, उपस्थितांसमोर भाषण पूर्ण करताना त्यांच्याकडून ‘आपलं मत शिट्टीला’ असा शब्द प्रयोग झाला आणि एकाच हशा पिकली आणि त्यावर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी गंमतीशीरपणे ‘पहिल्या बायकोला आणि पहिल्या प्रेमाला विसरू शकत नाही’ अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आमची निशाणी देखील चोरली असा आरोप देखील यावेळी केला.

हॅशटॅग्स

#Shivsena(1154)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x