मुंबई : राज ठाकरे राज्यभर दौरे करून ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना तोंडघशी पाडत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी कसे शहिदांच्या नावाने मतं मागत आहेत आणि एवढंच नाही जन्मदात्या आईच्या नावाने देखील ते स्वतःच मार्केटिंग करतात असा थेट आरोप मोदींवर करताना, जर मोदी सैनिकांचे झाले नाहीत तर ते जनतेचे कसे होतील, असा थेट सवाल ते सभेत मतदाराला करत आहेत.
दरम्यान, मोदी कोणाचेच नाहीत याचा पुरावा देणारा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. सर्वसाधारणपणे आपण वाईट काळात कामी आलेल्या लोकांना कधीच विसरत नाही. परंतु मोदी कोणाचेही उपकार ध्यानात ठेवत नाहीत असाच काहीसा प्रत्यय या व्हिडिओमधून येतो. गुजरात राज्याशी विशेष प्रेम दाखवणारे मोदी गुजरातला संकट काळात मदत करणाऱ्या व्यक्तीला ते सर्वाधिक लक्ष करत आहेत आणि अगदी त्यांचे कौटुंबिक विषय देखील मोदी भर सभेत मांडत आहेत.
गुजरातमध्ये भुज येथे २००१ साली झालेल्या भयंकर भूकंपात हजारो लोकांनी जीव गमावला होता. अत्यंत बिकट परिस्थितीतून गुजरात त्यावेळी जात होता. त्याच गुजरातमध्ये जाऊन लातूर भूकंपादरम्यानचा अनुभव वापरून शरद पवार गुजरात सरकार आणि गुजराती माणसाच्या मदतीला धावून गेले होते. विशेष म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ते शरद पवारांबाबतच सत्य मान्य करत स्वतः बारामतीत आले असता उपस्थितांना त्याची आठवण करून दिली होती आणि गुजरात भूकंपादरम्यानच शरद पवार यांचं योगदान मान्य केलं होतं.
दरम्यान, केशूभाई पटेल यांच्या स्वास्थ कारणामुळे २००१ सालापासून गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर विराजनमान झालेले नरेंद्र मोदी यांना २००९ मध्ये निवडणुकीच्या कारणास्तव बारामतीला येण्याची संधी मिळाली तेव्हा देखील त्यांनी शरद पवारांना, त्यावेळी त्यांची छाती थोडी आकाराला कमी म्हणजे ४६ इंचाची होती. सध्या मोदी देशभर ५६ इंचाची छाती दाखवत असले तरी, २००१ मध्ये गुजरात राज्याला आणि गुजराती माणसाला कठीण काळात मदत करणाऱ्या शरद पवारांना २००९ मध्ये बारामतीत येऊन कृतज्ञता व्यक्त करण्या ऐवजी ‘गुजरात बनाने के लिए ४६ इंच का सीना होना चाहिए’ बोलत खरमरीत टीका केली होती. त्यामुळे गुजरात असो कि देश, भारतावर आणि भारतीयांवर कोण खरं प्रेम करत हे या व्हिडिओ द्वारे सिद्ध होतं आहे. तसेच राज ठाकरे यांचा देखील तो दावा सत्यात उतरतो, ज्यामध्ये त्यांनी भर सभेत आरोप केला होता की ‘मोदी जर सैनिकांचे होऊ शकले नाही तर तुमचे कसे होतील’.
VIDEO: काय आहे तो नेमका व्हिडिओ?
