17 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

Delhi Liquor Scam | दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी होणार, सीबीआयने समन्स बजावले

Delhi Liquor Scam

Delhi Liquor Scam | मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना १६ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

सीबीआयने समन्स बजावले
सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवले आहे. सीबीआयने केजरीवाल यांना १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारू घोटाळ्यात काही पुरावे गोळा केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. अरविंद केजरीवाल यांना १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पोहोचावे लागणार आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात आहेत. आता सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

केजरीवालांवर आरोप काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर दारू घोटाळ्यातील आरोपींशी बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे. दारू व्यापाऱ्यांना दिल्लीत येऊन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोपही केजरीवाल यांच्यावर करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्याबाबत अनेक पुरावे गोळा करण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. आता सीबीआय १६ एप्रिलला केजरीवाल यांची चौकशी करणार आहे.

आप’ने घेतली पत्रकार परिषद
आप’चे नेते संजय सिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘अत्याचाराचा अंत नक्कीच होईल. अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजावल्याप्रकरणी मी संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. ज्या दिवशी अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींच्या मित्राच्या कंपनीत गुंतवलेला लाखो-कोटींचा काळा पैसा हा खरं तर पंतप्रधान मोदींचा पैसा आहे, त्याच दिवशी मी अरविंदजींना सांगितलं की पुढचा नंबर आता तुमचा असेल. संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला आणि म्हटले की, “हे लोक (सीबीआय) पंतप्रधान मोदींचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी सर्वकाही वाचवतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Delhi Liquor Scam CBI summon CM Arvind Kejriwal check details on 14 April 2023.

हॅशटॅग्स

#Delhi Liquor Scam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x