
Elgi Equipments Share Price Today | कोविड-19 शेअर बाजार अस्थिर झाला आणि अजूनही बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. असे असूनही अनेक कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ‘एल्गी इक्विपमेंट्स’ या एअर कॉम्प्रेसर बनवणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली होती. या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात असे तज्ञ म्हणाले. (Elgi Equipments Limited)
गुंतवणुकीवर परतावा :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘एल्गी इक्विपमेंट्स’ कंपनीचे शेअर्स 6.52 टक्क्यांच्या वाढीसह 507.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 3 एप्रिल 2020 रोजी ‘एल्गी इक्विपमेंट्स’ कंपनीचे शेअर्स 52.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.17 टक्के घसरणीसह 491.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या काळात ‘एल्गी इक्विपमेंट्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 876 टक्के परतावा कमावून दिला आहे.
‘एल्गी इक्विपमेंट्स’ कंपनीच्या शेअरची किंमत मागील 6 महिन्यांत 13.14 टक्क्यांनी वाढली आहे. ‘एल्गी इक्विपमेंट्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 566.60 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 248.70 रुपये प्रति शेअर होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 16070.46 कोटी रुपये आहे.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने ‘एल्गी इक्विपमेंट्स’कंपनीच्या शेअरवर 530 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की, या कंपनीचे शेअर्स 490 ते 494 रुपयांच्या श्रेणीत खरेदी केली जाऊ शकतात. डिसेंबर तिमाहीत कर कपातीनंतर तिसऱ्या तिमाहीत ‘एल्गी इक्विपमेंट्स’ कंपनीने 80.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एक वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीने 41.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.