
KEI Industries Share Price Today | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मल्टीबॅगर परतावा कमवू इच्छित असाल तर वायर आणि केबल्स बनवणाऱ्या केईआय इंडस्ट्रीज या मिडकॅप कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवा. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बक्कळ कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 51.81 टक्के नफा कमावून दिला आहे.
आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी हा कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के घसरणीसह 1,893.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1922.95 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1,040 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 17091 कोटी रुपये आहे.
स्टॉकची कामगिरी :
केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. यावर्षी आतापर्यंत शेअरची किंमत 28 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 3 वर्षात या शेअरची किंमत 606 टक्क्यांनी वधारली आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17400 टक्के परतावा कमावून दिला आहे.
10 वर्षात करोडपती :
एप्रिल 2013 मध्ये या कंपनीचे शेअर्स 10.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 1900 रुपयेवर पोहचला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 175 पट वाढले आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी 75 लाख रुपये झाले असते.
कंपनीबद्दल थोडक्यात :
केईआय इंडस्ट्रीज ही कंपनी वायर आणि केबल बनवण्याचे काम करते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये एक्स्ट्रा हाय व्होल्टेज केबल, हाय व्होल्टेज केबल, लो व्होल्टेज केबल, इन्स्ट्रुमेंटेशन केबल, कंट्रोल केबल, सोलर केबल, हाऊस वायर, सिंगल कोअर/मल्टीकोर फ्लेक्सिबल केबल, थर्मोकूपल एक्स्टेंशन / कम्पेन्सटिंग केबल, रबर केबल, फायर सायव्हल / रिसिसीबल, मरीन आणि ऑफशोर केबल, विंडिंग वायर आणि स्टेनलेस स्टील वायर, यासारखे उत्पादनाचा समावेश होतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.