4 May 2025 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Karnataka Election | गाजर वाटप? सत्तेत असताना दिलं नाही ते आता, 3 मोफत सिलिंडर आणि गरिबांना दररोज मोफत दूध, भाजपचा जाहीरनामा

Karnataka Election BJP

BJP Manifesto Karnataka | आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने मोफत गॅस सिलिंडरवर जोर दिला आहे. भारतीय जनता पक्ष याला ‘जनतेचा जाहीरनामा’ म्हणत आहे. तसेच या माध्यमातून राज्यातील महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. राज्यात १० मे रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी १३ मे रोजी होणार आहे.

जाहीरनाम्यात काय आहे?
राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. त्याचबरोबर सत्तेत आल्यावर एनआरसी लागू करण्याची घोषणाही पक्षाने केली आहे. भाजपने उगादी, दिवाळी आणि गणेश चतुर्थीला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच बीपीएल कार्डधारकांना दररोज मोफत दूध मिळणार आहे.

भाजप पक्षाने पुन्हा सरकार स्थापन केल्यास बेंगळुरूला राजधानी क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे आश्वासन दिले आहे. सहा लाखांहून अधिक लोकांच्या सूचना घेऊन जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती भाजपने दिली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये विस्तार करू पाहणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

जाहीरनाम्यातील भाजपची आश्वासने
* कर्नाटकात समान आचारसंहिता
* दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध
* दर महिन्याला कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ५ किलो तांदूळ आणि ५ किलो बाजरी मिळणार आहे.
* उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीनिमित्त बीपीएल कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर
* कर्नाटक मालकी कायद्यात सुधारणा
* प्रत्येक वॉर्डात लॅब
* म्हैसूरच्या फिल्म सिटीला दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांचे नाव देण्यात येणार आहे.
* अटल आहार केंद्र

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka Election BJP Manifesto Karnataka check details on 01 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Karnataka Election BJP(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या