18 May 2024 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा
x

Datamatics Share Price | या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 20 टक्के वाढले, कारण जाणून गुंतवणूक करा, मजबूत फायदा होईल

Datamatics Share Price

Datamatics Share Price | ‘डेटामॅटिक्स’ कंपनीच्या शेअरसाठी मंगळवार चा ट्रेडिंग सेशन खूप खास होता. या दिवशी शेअरची किंमत गगनाला भिडली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेटामॅटिक्स कंपनीच्या शेअरने 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट तोडला आणि स्टॉक 414.20 रुपयेवर पोहचला होता. दिवसा अखेर शेअरची किंमत 19.84 टक्के वाढीसह 413.70 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. जबरदस्त तिमाही आर्थिक निकाल जाहीर केल्याने डेटामॅटिक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये ही तेजी पाहायला मिळाली होती. आज बुधवार दिनांक 3 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 413.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तिमाही परिणाम तपशील : मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत डेटामॅटिक्स कंपनीच्या महसुलात YoY आधारावर 32.9 टक्के आणि तिमाही Q०Q आधारावर 11.7 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. या वाढीनंतर कंपनीने 416.30 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीची व्याज आणि करपूर्व कमाई देखील वार्षिक अंदाजे 78 टक्के आणि Q00 आधारे 50 टक्क्यांच्या वाढीसह 75.3 कोटीवर पोहचली होती.

लाभांशाची घोषणा : डेटामॅटिक्स कंपनीच्या संचालक मंडळाने एका शेअरवर 5 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 3.75 रुपये हा अंतिम लाभांश असेल तर 1.25 रुपये विशेष लाभांश असेल. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. डेटामॅटिक्स कंपनीच्या स्टॉकने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 752.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 251.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. याशिवाय एक वर्ष, सहा महिने, तीन महिने आणि एक महिन्याच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने लोकांना 33 ते 43 टक्के इतका परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात हा स्टॉक 40 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Datamatics Share Price today on 03 May 2023.

हॅशटॅग्स

Datamatics Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x