15 December 2024 11:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, शेअर प्राईस बँड 49 रुपये, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | मागील वर्षभरात अनेक IPO पहिल्याच दिवशी मोठा परतावा देत आहेत. अनेक IPO शेअरने गुंतवणूकदारांना एकदिवसात मल्टिबॅगर परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार नवीन IPO ची वाट पाहत असतात. आता IPO गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

IPO शेअर प्राईस बँड
प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनीचा IPO सोमवार २१ ऑक्टोबर पासून सबस्क्राईब करता येणार आहे. तसेच बुधवार २३ ऑक्टोबर रोजी बंद होईल. प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी IPO साठी 46 ते 49 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे. प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी IPO मध्ये गुंतवणूकदारांना किमान ३,००० इक्विटी शेअर्सची बोली लावावी लागेल.

IPO तपशील
प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये 26.20 कोटी रुपये किंमतीच्या एकूण 5,346,000 इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये ‘OFS’ घटक नाही. प्रिमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी आयपीओसाठी खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेड कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. तसेच प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी IPO साठी बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

कंपनी पैशाचा वापर कुठे करणार
प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनीच्या IPO साठी असनानी स्टॉक ब्रोकर कंपनीला मार्केट मेकर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी या ऑफरमधून मिळालेल्या पैशाचा वापर मध्य प्रदेशातील पीथमपूर येथील सध्याच्या उत्पादन प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन मशिनरी खरेदी करण्यासाठी करणार असल्याचे म्हटले आहे. प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी IPO मार्फत मिळालेल्या पैशाचा सध्याच्या उत्पादन केंद्रात रूफटॉप ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा खर्च आणि अन्य कॉर्पोरेट हेतू पूर्ण करण्यासाठी होणार आहे.

ग्रे-मार्केटमध्ये स्थिती
मीडिया रिपोर्टनुसार, प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी IPO चा GMP सध्या 5 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी आयपीओचा प्राइस बँड आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता, प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी IPO शेअरची अंदाजित लिस्टिंग प्राईस प्रति शेअर 54 रुपये आहे, जी 49 रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा 10.2 टक्क्याने अधिक आहे.

कंपनीबद्दल माहिती
प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनी पॅरेण्ट इक्विपमेंट उत्पादकांसाठी ऑटोमोटिव्ह कंपोनंट प्रोव्हाइड म्हणून काम करते. प्रीमियम प्लास्ट लिमिटेड कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये एक्सटर्नल प्लास्टिक कंपोनंट, इंटर्नल केबिन कंपोनंट आणि कमर्शिअल वेहिकल्स OEM साठी हुड कंपोनंट अंतर्गत डिझाइन, प्रोडक्शन आणि सप्लाय यांचा समावेश आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Premium Plast Ltd 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x