16 December 2024 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Droneacharya Aerial Share Price | या ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल केले, अल्पावधीत भरघोस परतावा देतोय

Droneacharya Aerial Share Price

Droneacharya Aerial Share Price| ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ या पुणे स्थित ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 144.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 96.90 रुपये होती. तर आज बुधवार दिनांक 3 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 7.77 टक्के वाढीसह 155.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

12 जानेवारी 2023 रोजी ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर 243.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर पोहचले होते. डिसेंबर 2022 मध्ये हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ कंपनीचा IPO डिसेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती. शंकर शर्मा यांसारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी ही या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स IPO शेअर खरेदी केले होते, त्यांना मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 12.85 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन ही पुणे स्थित एक ड्रोन स्टार्टअप कंपनी आहे.

या कंपनीने सिव्हिल एव्हिएशन महासंचालक प्रमाणित रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन परवाना मिळवला आहे. ही कंपनी सानुकूलित स्वदेशी ड्रोनच्या निर्मितीमध्ये उतरण्याची तयारी करत असल्याची माहिती कंपनीचे संस्थापक प्रतीक श्रीवास्तव यांनी दिली. ही कंपनी ड्रोन पायलट प्रशिक्षण, सेवा आणि ड्रोन निर्मिती या क्षेत्रात व्यवसाय करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Droneacharya Aerial Share Price today on 03 May 2023.

हॅशटॅग्स

Droneacharya Aerial Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x