28 April 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार?
x

लोकसभेत बिथरलेल्या भाजप नगरसेवक व ८-१० छपरी कार्यकर्त्यांचा मनसैनिकावर हल्ला, सर्वजण फरार

MNS, Raj Thackeray, Devendra Fadanvis, Loksabha Election 2019

पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरील रागातून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने महाराष्ट्र सैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला आहे. जवळपास ८ ते १० गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मनसैनिकावरील हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्याने भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य उघड झालं आहे.

विजय चिपळेकर हे पनवेल महानगर पालिकेतील कामोठे भागातील नगरसेवक आहेत. २९ एप्रिलला रात्री १२ वाजल्यानंतर विजय चिपळेकर यांनी मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी चिपळेकर यांच्यासोबत आठ ते दहा गुंड कार्यकर्ते होते. या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले आहेत. शिवाय गुन्हा नोंद होऊ नये यासाठी स्थानिक कामोठे पोलीस स्टेशनवर दबाव आणत आहेत.

“वैयक्तिक कारण पुढे करत मनसेवर असलेल्या रागामुळे भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मतदान संपल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केला आहे.”, अशी प्रतिक्रिया मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आणि प्रशांत जाधव यांचे भाऊ महेश जाधव यांनी दिली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x