13 May 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या
x

Manappuram Finance Share Price | मणप्पुरम फायनान्स गोल्ड कंपनी संबधित बातमीने 3 दिवसात शेअर 21 टक्क्याने घसरला, पुढे काय होणार?

Manappuram Finance Share Price

Manappuram Finance Share Price Today | ‘मणप्पुरम फायनान्स’ या गोल्ड लोन देणाऱ्या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 14 टक्क्यांनी कोसळले. शेअर्स घसरणीचे मुख्य कारण म्हणजे ईडी कनेक्शन आहे. केंद्रीय तपास एजन्सी ‘ईडी’ ने ‘मणप्पुरम फायनान्स’ आणि केरळमधील त्रिशूर येथे राहणाऱ्या एमडी ‘व्हीपी नंदकुमार’ यांच्यासह अनेक लोकांवर छापेमारी केली आहे.

ईडीने या छापेमारीत 143 कोटी रुपये एवढी मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती दिली आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपासंदर्भात ईडीने ही मोठी छापेमारी केल्याची माहिती दिली आहे. ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स अवघ्या तीन दिवसांत 21 टक्के कोसळले आहेत. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.90 टक्के घसरणीसह 106.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ईडीला तपासात काय आढळले? :
‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीच्या एमडीवरील मनी लाँडिंगच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांच्या छापेमारी केली होती. ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीच्या एमडीने जमा केलेले पैसे चुकीच्या पद्धतीने विविध क्षेत्रात वळवले आणि नंतर ते त्याच्या स्वत:च्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्ता आणि कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. आणि अशा परिस्थितीत प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत ईडीने नंदकुमार यांची 143 कोटी रुपयांची मालमत्ता फ्रीज केली असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये आठ बँक खात्यांमधील त्यांच्या रोख ठेवी आणि मणप्पुरम फायनान्ससह शेअर्समधील गुंतवणुक ही फ्रीज करण्यात आली आहे.

‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स मागील तीन दिवसात 21 टक्के कमजोर झाले आहेत. मागील वर्षी मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 20 जून 2022 रोजी 81.50 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यानंतर 10 महिन्यांपूर्वी म्हणजेच 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 133.90 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांकावर पोहोचले आहेत.

यानंतर शेअर्समधील तेजी थांबली. आणि ईडीच्या छाप्यामुळे शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. कंपनीवरील ईडीच्या छाप्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये जबरदस्त घबराट पसरली असून स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढत आहे. मागील तीन दिवसांत हा स्टॉक 21 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

तांत्रिक चार्टवर शेअरचा ट्रेंड :
ICICI फर्मच्या तज्ज्ञांच्या मते मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स चार्टवर 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये 103.3 रुपयेवर मजबूत सपोर्ट आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 17.09 टक्के घसरले आहेत. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 10.98 टक्के घसरले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Manappuram Finance Share Price Today on 06 May 2023.

हॅशटॅग्स

Manappuram Finance Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x