16 May 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदर वाढले, किती फायदा होणार पटापट तपासून घ्या SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा
x

Federal Bank Share Price | झुनझुनवाला फॅमिली फेडरल बँकच्या शेअरमधून मजबूत कमाई करतंय, मालामाल करणारा शेअर खरेदी करणार?

Federal Bank Share Price

Federal Bank Share Price | ‘फेडरल बँक’ या खाजगी क्षेत्रातील बँकेने मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत 67 टक्क्यांच्या वाढीसह 902.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘फेडरल बँक’ च्या मार्च 2023 तिमाहीच्या जबरदस्त कामगिरीमुळे शेअर तेजीत आले आहेत. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी ‘फेडरल बँक’ चे शेअर्स 0.66 टक्के वाढीसह 129.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी देखील ‘फेडरल बँक’ मध्ये मोठी गुंतवणुक केली होती. आता त्यांचा पोर्टफोलिओ त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला सांभाळत आहे.

झुनझुनवाला पोर्टफोलिओ :
मार्च 2023 तिमाहीच्या शेवटी राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये ‘फेडरल बँक’ चे एकूण 2,45,00,000 शेअर्स सामील आहेत. तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील ‘फेडरल बँक’ चे 4,82,13440 शेअर्स होल्ड केले आहेत. एकत्रितपणे झुनझुनवाला कुटुंबाने फेडरल बँकेचे 3.48 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

SBI म्युच्युअल फंड आणि टाटा म्युच्युअल फंड यासारख्या म्युचुअल फंडानी देखील ‘फेडरल बँक’ मध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. फेडरल बँकने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, बँक आपले 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 50 टक्के म्हणजेच 1 रुपये लाभांश वाटप करणार आहे. या लाभांशाचा अंतिम निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत होण्याचे प्रलंबित आहे.

तिमाही कामगिरी :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत ‘फेडरल बँक’ ने 1,909.29 कोटी रुपये निव्वळ व्याज उत्पन्न कमावले आहे. मार्च 2022 मध्ये बँकेने 1,525.21 कोटी रुपये निव्वळ व्याज उत्पन्न कमावले होते, जे मार्च तिमाहीत 25.18 टक्के वाढले आहे. मार्च 2022 च्या तुलनेत मार्च 2023 मध्ये ‘फेडरल बँक’ चे नॉन परफॉर्मिंग अॅसेट म्हणजेच बुडीत कर्जे 2.36 टक्के नोंदवले गेले आहे. मार्च 2022 मध्ये बँकेचा NPA 0.96 टक्के होता, जो मार्च 2023 मध्ये कमी होऊन 0.69 टक्केवर आला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये फेडरल बँकेने 59.31 टक्के वाढीसह 3,010.59 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Federal Bank Share Price Today on 09 May 2023.

हॅशटॅग्स

#Federal Bank Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x