6 May 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार?
x

Unemployment in Private Jobs | खाजगी क्षेत्रात बेरोजगारी वाढली, संतप्त तरुण प्रश्न विचारू नये म्हणून मोदींच्या हस्ते 'सरकारी नियुक्त्यांचे मेळावे'

Unemployment in Private Jobs

Unemployment in Private Sector | मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी खासगी क्षेत्रात प्रतिवर्षी २ कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं वचन दिलं होतं. मात्र मागील १० वर्षात खासगी क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अनेक राज्यात बेरोजगारी हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. कर्नाटकातही बेरोजगारी आणि महागाई प्रमुख मुद्दा होता. मात्र सर्वच बाजूने टीका होऊ लागल्यावर मोदी सरकारने एक पळवाट काढली आहे. विशेष त्याचे देखील इव्हेन्ट करण्याचा सपाटा लावला आहे.

नुकतीच एकनाथ शिंदे यांच्या मार्फत शिवसेनेत फूट पडून महाराष्ट्रातील सरकार पाडलं आणि त्यानंतर शिंदे सरकारने देखील असाच नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपत्रांचा इव्हेन्ट मोदींसाठी केला होता. देशातील एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के रोजगार हा खासगी क्षेत्राशी संबंधित असून तिकडे अधिक रोजगार असणं गरजेचं असताना असे प्रकार केले आहेत. जेणे करून आम्ही रोजगार देतं आहोत असं चित्र निर्माण करणे उद्देश असावा असं म्हटलं जातंय.

पाचव रोजगार मेळावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाचव्या रोजगार मेळाव्याअंतर्गत मंगळवारी ७१ हजार नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी ही माहिती दिली. यावेळी ते नियुक्त्यांना संबोधितही करतील. विशेष म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे सरकार भरती प्रक्रियेचा वेग वाढवत आहे.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, “पंतप्रधान मोदी 16 मे रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्यात सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त लोकांना 71,000 नियुक्ती पत्रे देतील.” देशभरात ४५ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले. या उपक्रमाला पाठिंबा देणारे केंद्र सरकारचे विभाग आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही भरती केली जात आहे.

भरती कुठल्या सरकारी विभागात
ग्रामीण डाकसेवक, टपाल निरीक्षक, वाणिज्य व मुद्रांक लिपिक, कनिष्ठ लिपिक व टंकलेखक, कनिष्ठ लेखा लिपिक, ट्रॅक मेंटेनर, सहाय्यक विभाग अधिकारी, वर्ग लिपिक, उपविभागीय अधिकारी, कर सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, निरीक्षक, नर्सिंग अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, विभागीय लेखा निरीक्षक, लेखापरीक्षक, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट कमांडंट, हेडमास्तर, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, सहाय्यक निबंधक, सहाय्यक प्राध्यापक अशी विविध पदांची नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.

बेरोजगारीवरून टीका होताच २०२२ पासून इव्हेन्ट सुरु
रोजगार मेळाव्याचा पाचवा टप्पा आज म्हणजे मंगळवारी होणार आहे. याची सुरुवात २२ ऑक्टोबर २०२२ रोजी झाली. त्यावेळी विविध राज्यातील ७५ हजारांहून अधिक नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दुसरा टप्पा २२ नोव्हेंबर २०२२ (७१ हजार), तिसरा टप्पा २० जानेवारी २०२३ (७१ हजार) आणि चौथा टप्पा १३ एप्रिल २०२३ रोजी झाला. वितरणाच्या वेळी केंद्र तसेच संबंधित राज्य सरकारमधील सर्व वरिष्ठ मंत्र्यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Unemployment in Private Jobs in India check details on 16 May 2023.

हॅशटॅग्स

#Unemployment in Private Jobs(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x