19 July 2019 9:45 AM
अँप डाउनलोड

पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा कोलमडली, तब्बल ७०० डॉक्टरांचे राजीनामे

पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा कोलमडली, तब्बल ७०० डॉक्टरांचे राजीनामे

कोलकाता : कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील २ डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. सदर घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर काल शुक्रवारपासून संपावर होते. डॉक्टरला मारहाण केल्यानंतर सुरू झालेल्या डॉक्टरांचे कामबंद आंदोलन आता देशभर पसरले असून, महाराष्ट्र, बिहार, नवी दिल्ली, गोवा, झारखंडसह अनेक राज्यांतील डॉक्टर त्यात मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ७०० डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.

डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत पश्चिम बंगाल सरकार पुरेसे गंभीर नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ तब्बल ७०० डॉक्टरांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत. या आंदोलनामुळे मुंबईसह महाराष्ट्र, तसेच दिल्ली व अनेक राज्यांतील आरोग्यसेवेवर मोठे परिणाम झाल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे राज्य सरकारने डॉक्टरांशी चर्चा करून लवकर तोडगा काढावा, असे कोलकाता हायकोर्टाने बंगाल सरकारला सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी सरकारी डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु, डॉक्टर आंदोलनावर ठाम आहेत.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या