29 April 2024 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

IPO Investment | आयपीओ असावा तर असा! फ्री बोनस शेअर्समुळे फक्त 109 शेअर्सवर 1,71,893 रुपये परतावा मिळाला

IPO Investment

IPO Investment | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना विविध मार्गाने फायदे मिळत असतात. अनेक वेळा शेअर धारक बोनस शेअर्सच्या माध्यमातून देखील श्रीमंत होतात. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे गुंतवणूकदार देखील बोनस शेअरच्या माध्यमातून मालामाल झाले आहेत. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ मल्टीबॅगर परतावा नाही तर बोनस शेअर्स वाटप करून मजबूत फायदा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के वाढीसह 1,577.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीचे सविस्तर तपशील :
‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचा IPO ऑक्टोबर 2016 मध्ये शेअर बाजारात 440 ते 445 रुपये प्रति इक्विटी शेअर या प्राइस बैंडवर लाँच करण्यात आला होता. वरुण बेव्हरेजेस कंपनीने IPO च्या एका लॉटमध्ये 33 शेअर्स जारी केले होते. गुंतवणूकदारांना एक लॉटसाठी 14,685 रुपये जमा करावे लागले होते.

बोनस शेअर्सचा इतिहास :
शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. तिन्ही वेळा कंपनीने गुंतवणूकदारांना 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. वरुण बेव्हरेजेस कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 25 जुलै 2019, 10 जून 2021 आणि 6 जून 2022 रोजी एक्स बोनसवर ट्रेड करत होते. बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या वाढून 109 झाली होती.

शेअर्सची गणना :
पहिल्यांदा जेव्हा कंपनीने 1 : 2 या प्रमाणात बोनस दिले तेव्हा गुंतवणूकदारांच्या 33 शेअर्सची संख्या वाढून 49 झाली. दुसरा बोनस दिल्यानंतर 49 शेअरची संख्या 73 झाली. तिसऱ्यांदा बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्या 109 झाली होती. सध्या वरुण बेव्हरेजेस कंपनीचे शेअर्स 1,577.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या प्रमाणे गुंतवणूकदारांना 109 शेअरवर सध्याच्या किमतीनुसार 171,893 रुपये परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO Investment of Varun Beverages share price check details on 16 May 2023.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x