Adani Transmission Share Price | अदानी ट्रान्समिशन शेअरची घसरण थांबेना, शेअर 70 टक्क्यांनी खाली, आता खरेदी करावा का?

Adani Transmission Share Price | हिंडनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहातील शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली होती. आणि अजूनही ही घसरण थांबलेली नाही. ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये 70 टक्क्यांनी खाली आले आहे. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे खूप मोठे नुकसान केले आहे.

आर्थिक वर्ष 2018-20, आर्थिक वर्ष 2019-21, FY2020-22 आणि FY2021-23 या काळात ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला होता. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के घसरणीसह 778.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आर्थिक वर्ष 2018-20 या तीन वर्षांच्या काळात ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरने लोकांना 193 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी हा स्टॉक आर्थिक वर्ष 2019-21 दरम्यान 375 टक्क्यांनी वाढला होता. त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष 2020-22 मध्ये, ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरने लोकांना 989 टक्के परतावा कमावून दिला होता.

याशिवाय आर्थिक वर्ष 2021-23 मध्ये या काळात ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 429 टक्के वाढले होते. ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरची 52 आठवडयांची उच्चांक पातळी किंमत 4,236.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 631.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 89,116.71 कोटी रुपये आहे.

अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के घसरणीसह 790 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 630 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी 16 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 4,238 55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी ट्रान्समिशन कंपनीने 8500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनीने शेअर धारकांना मंजुरी देण्याची विनंती केली आहे. पात्र संस्थात्मक प्लेसमेंट आधारावर इक्विटी शेअर्स किंवा इतर सिक्युरिटीज जारी करून कंपनी भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. यापूर्वी अदानी ट्रान्समिशन कंपनीने माहिती दिली होती की, कंपनी नवीन प्रकल्प आणि विलीनीकरणा व्यतिरिक्त अधिग्रहणाद्वारे व्यापार वाढीच्या संधी शोधत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Transmission Share Price today on 18 May 2023.