20 May 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअरच्या शेअरने दिला बंपर परतावा, गुंतवणुकदार झाले करोडपती, तुम्ही खरेदी करणार?

Sonata Software Share Price

Sonata Software Share Price | ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ या दिग्गज IT कंपनीने 13 मे 2023 रोजी मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. त्याच दिवशी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 8.75 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत धावत आहेत.

तिमाही निकाल आल्यापासून सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स तब्बल 16 टक्क्यांनी वाढले आहे. मागील 19 वर्षांत या कंपनीच्या शेअरने अवघ्या 86,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 3.80 टक्के घसरणीसह 922.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉकवर तज्ञ उत्साही :
सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने मार्च तिमाहीत वार्षिक 30.7 टक्क्यांच्या वाढीसह 1,913.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तथापि, तिमाही आधारावर कंपनीच्या महसूलात 15.4 टक्क्यांची घट झाली आहे. जानेवारी-मार्च 2023 मध्ये कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 12.8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर तिमाही आधारावर हा कंपनीचा निव्वळ नफा 3.3 टक्क्यांच्या घसरणीसह 113.8 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

ब्रोकरेज फर्म KRChoksey च्या तज्ज्ञांच्या मते, मजबूत डीलची शक्यता, एंटरप्राइझ क्लायंटवर वाढलेले लक्ष, आणि व्यवस्थापित क्लाउड सेवांमध्ये अनुकूल वातावरण, यामुळे मध्यम ते दीर्घ कालावधीत कंपनीच्या व्यवसायात मजबूत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्मने सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या स्टॉकवर 1,128 रुपये लक्ष्य किंमत देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

19 वर्षात दिला 11571 टक्के परतावा :
सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 14 मे 2004 रोजी 8.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आतापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये 11571 टक्क्यांची वाढ होऊन स्टॉक 958.20 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 19 वर्षांत ज्या लोकांनी या स्टॉकवर 86.000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता करोडो रुपये झाले असते.

अल्पावधीत ही या स्टॉक ने लोकांना मजबूत कमाई करून दिली आहे. 20 जून 2022 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 457.50 रुपये या एका वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यांनतर अवघ्या 11 महिन्यांत स्टॉक 985 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sonata Software Share Price today on 18 May 2023.

हॅशटॅग्स

Sonata Software Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x