13 December 2024 2:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये आज मोठी उसळी, येस बँक स्टॉकमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली, नेमकं कारण काय?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | ज्या लोकांनी येस बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. मार्च महिन्यात येस बँकेचा लॉक इन कालावधी संपणार आहे. आयसीआयसीआय बँक, अक्सिस बैंक, आयडीएफसी फर्स्ट बैंक, एचडीएफसी बैंक, या सर्व दिग्गज बँकांचा देखील 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपणार आहे. अशा परिस्थितीत लॉक इन कालावधी संपल्यानंतर अनेक दिग्गज गुंतवणुकदार किंवा गुंतवणूक संस्था येस बँकेचे शेअर्स विकून बाहेर पडू शकतात. यामुळे येस बँक शेअरवर जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळू शकतो. बुधवारी सकाळी (०१ मार्च २०२३) शेअर 4.30% वाढून 18.20 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

येस बँकेच्या शेअर्सने डिसेंबर 2022 मध्ये 24.75 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मात्र त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत खाली आली. येस बँकेच्या शेअरची किंमत उच्चांक किंमत पातळीवरून 35 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 4.27 टक्के वाढीसह 17.10 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

जेव्हा ICICI, Axis Bank सारख्या दिग्गज बँकांनी येस बँकेमध्ये पैसे लावले होते, तेव्हा येस बँकेच्या शेअरची किंमत फकत 10 रुपये होती. मात्र मागील 2 महिन्यांत शेअरची किंमत 35 टक्क्यांनी घसरल्यानंतरही ICICI आणि ॲक्सिस बँक अजूनही 60 टक्के नफ्यात आहेत. आता मात्र त्यांचा लॉक इन कालावधी मार्च 2023 मध्ये संपणार आहे. जर या बँकांनी आपले शेअर्स विकून प्रॉफिट बुक करण्याचा विचार केला तर, येस बँकेच्या शेअरमध्ये उतरती कळा लागु शकते.

येस बँकेच्या शेअरची कामगिरी :
चॉईस ब्रोकिंग फर्मचे तज्ञ म्हणतात की, “येस बँकेच्या शेअरला 15 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट आहे. या शेअरमध्ये सध्या तेजीचे संकेत मिळत आहे. आणि विपरीत परिस्थिती नजर अंदाज केली तर पुढील काळात हा स्टॉक 20 रुपये च्या पार जाऊ शकतो. लॉक इन कालावधी संपल्यानंतर जर गुंतवणूक करणाऱ्या बँकांनी प्रॉफिट बुक केला तर स्टॉकमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price 532648 YESBANK stock market live on 01 March 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x