 
						Krishca Strapping Solutions IPO | ‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ या स्मॉल कॅप कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अद्भूत प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO शेअर बाजारात एकूण 127.16 पट सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 291.94 पट सबस्क्राइब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा एकूण 150.47 पट सबस्क्राईब झाला आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 5 पट सबस्क्राईब झाला आहे.
‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ GMP :
‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO ला ग्रे मार्केटमध्ये मजबूत प्रतिसाद मिळाला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये ‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ कंपनीचे IPO शेअर्स 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 51-54 रुपये निश्चित केली होती.
जर कंपनीचे शेअर्स 54 रुपये किमतीवर इश्यू झाले, आणि 75 रुपये GMP टिकुन राहिले तर ‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ कंपनीचे शेअर्स 129 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ कंपनीचे शेअर्स 138.89 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ IPO तपशील :
कृष्का स्ट्रॅपिंग सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 29 मे 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होतील. या कंपनीचा IPO 16 मे 2023 ते 19 मे 2023 दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. बुधवार 24 मे 2023 रोजी IPO शेअर्सचे वाटप केले जाईल. कृष्का स्टॅपिंग सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जाणार आहे.
किरकोळ गुंतवणूकदार फक्त 1 लॉट खरेदी करू शकता. आणि 1 लॉटमध्ये कंपनी 2000 शेअर्स जारी करणार आहे. म्हणजेच, 1 लॉटसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना 1.08 लाख रुपये जमा करावे लागणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		