
Veerkrupa Jewellers Share Price | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ ही कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Veerkrupa Jewellers Share Price Today)
यासोबत ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा देखील केली आहे. यात कंपनी आपले शेअर्स 10 भागात विभाजित करणार आहे. वीरकृपा ज्वेलर्स कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 19 मे 2023 हा दिवस निश्चित केला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.29 टक्के वाढीसह 3.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
10 महिन्यांत दिला 127 टक्के परतावा :
मागील 10 महिन्यांत वीरकृपा ज्वेलर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 127 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 जुलै 2022 रोजी ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनीचे शेअर्स 25.65 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 18 मे 2023 रोजी 58.35 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही 10 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.27 लाख रुपये झाले असते.
कंपनीबद्दल थोडक्यात :
वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचा IPO मागील वर्षी 29 जून 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 8 जुलै 2022 पर्यंत हा IPO ओपन होता. या कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत बँड 27 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO एकूण 1.85 पट सबस्क्राइब झाला होता. IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 2.67 पट सबस्क्राइब झाला होता.
या कंपनीचे शेअर्स 18 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. तर कंपनीचे शेअर्स 27 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. वीरकृपा ज्वेलर्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 146 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 24.40 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.