26 April 2024 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

ST महामंडळाला १ हजार कोटींचे अर्थसहाय्य | महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

One thousand crore, financial assistance, ST Mahamandal, Minister Anil Parab

मुंबई, २ डिसेंबर: मागील काही महिन्यांपासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन देणे देखील राज्यसरकारला कठीण झाले होते. त्यात वेतन मिळत नसल्याने घर प्रपंच चालवणे कठीण झाल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुःखद घटना देखील घडल्या होत्या. मात्र कर्मचाऱ्यांनी इतकं पाऊल उचलू नये अशी राज्य सरकारने देखील विनंती केली होती आणि सरकारच्या वतीने योग्य पाऊल उचलण्याची हमी दिली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच, कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे एसटी महामंडळाची वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळास (ST Mahamandal) राज्य शासनाकडून 1000 हजार कोटींचे विशेष अर्थसहाय्याला मंजुरी दिली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन मिळण्यास मदत होईल अशी आशा आहे. अनेकांना यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळेल आणि कोरोना आपत्तीत अधीकच वाढलेल्या अडचणी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतं आहे.

 

News English Summary: An important meeting of the state cabinet was held today under the chairmanship of Chief Minister Uddhav Thackeray. The meeting took an important decision to change the caste names of the settlements in the state. Also, due to the lockout of Kovid-19, the transport system of ST Mahamandal was closed. Therefore, a special financial assistance of Rs.1000 crore has been sanctioned by the state government to the Mahamandal for the salaries of the employees. This will be a great financial relief to the ST Mahamandal employees.

News English Title: One thousand crore financial assistance ST Mahamandal decisions in state cabinet meeting News updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x