Kaynes Technology Share Price | मालामाल करणारा शेअर! एका महिन्यात शेअरने 37 टक्के परतावा दिला, स्टॉकची खरेदी वाढली

Kaynes Technology Share Price | ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 1308.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 5 महिन्यांत शेअरने 93% परतावा दिला
दुसरीकडे मागील 5 महिन्यांत ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीच्या शेअरने लोकांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1328.65 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 625.05 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.91 टक्के घसरणीसह 1,282.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअरची कामगिरी :
‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे IPO शेअर्स 587 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 559-587 रुपये निश्चित केली होती. 22 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 775 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले होते. 22 मे 2023 रोजी ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे शेअर्स 1308.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचा IPO स्टॉक 34.16 पट सबस्क्राइब झाला होता.

गुंतवणूकीवर परतावा :
‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीच्या शेअर्सने या वर्षी आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2 जानेवारी 2023 रोजी ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे शेअर्स 740.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,282.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एका महिन्यात 37 टक्के परतावा
‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7606 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kaynes Technology Share Price today on 23 May 2023.