14 December 2024 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स मजबूत तेजीत, गुंतवणूक करून फायदा घ्यावा? जाणून घ्या टार्गेट प्राईस

Highlights:

  • अदानी पॉवर स्टॉक टार्गेट प्राईस :
  • 52 आठवड्यांची पातळी
  • मागील 3 महिन्यांत 53 टक्के परतावा दिला
  • मागील 3 वर्षांत 655 टक्के परतावा दिला
  • मार्च तिमाहीची आर्थिक कामगिरी
Adani Power Share price

Adani Power Share Price | सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या पॅनेलकडून अदानी समुहाला क्लीन चिट मिळताच अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स तेजीत आले. या दरम्यान अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स आज 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. स्टॉक मधील तेजी पाहून शेअर बाजारातील तज्ञांनी अदानी पॉवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 260.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी पॉवर स्टॉक टार्गेट प्राईस :
आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात या कंपनीचे शेअर्स 275 ते 300 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या कंपनीच्या शेअरला 220 रुपये किमतीवर मजबूत आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

52 आठवड्यांची पातळी
22 ऑगस्ट 2022 रोजी अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने 432.80 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने 132.55 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

मागील 3 महिन्यांत 53 टक्के परतावा दिला
अदानी पॉवर कंपनीच्या शेअर मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. तथापि, अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने एक वर्ष आणि सहा महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्सच्या तुलनेत नकारात्मक वाढ नोंदवली आहे.

मागील 3 वर्षांत 655 टक्के परतावा दिला
मागील तीन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 655 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1130 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मार्च तिमाहीची आर्थिक कामगिरी
अदानी पॉवर कंपनीने मार्च तिमाहीत 13 टक्के वाढीसह 5,242 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 4,645 कोटी रुपये नफा कमावला होता. तर मार्च तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक 13,307 कोटी रुपयांवरून कमी होऊन 10,795 कोटी रुपयेवर आले आहे. कंपनीचा एकूण खर्च वार्षिक आधारावर 7,174 कोटी रुपयांवरून वाढून 9,897 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share price today on 23 May 2023.

FAQ's

What is the Share Price of Adani Power?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. 23 मे 2023 रोजी अदानी पॉवरच्या शेअरची किंमत 260.25 रुपये आहे.

What is the Market Cap of Adani Power?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 23 मे 2023 पर्यंत अदानी पॉवरचे मार्केट कॅप 95,614 कोटी रुपये आहे.

What is the PE and PB ratio of Adani Power?

23 मे 2023 पर्यंत अदानी पॉवरचे पीई आणि पीबी रेशो 9.17165 आणि 3.20038 आहेत.

What is the 52 Week High and Low of Adani Power?

५२ आठवड्यांचा उच्चांक/नीचांकी दर हा त्या दिलेल्या कालावधीत (१ वर्षासारखा) अदानी पॉवरच्या समभागाने व्यवहार केलेला सर्वोच्च आणि सर्वात कमी भाव आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. 23 मे 2023 रोजी अदानी पॉवरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी आणि नीचांकी स्तर 432.50 रुपये आणि 132.40 रुपये आहे.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x