
Deepak Nitrite Share Price | ‘दीपक नायट्रेट’ या स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘दीपक नायट्रेट’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 2160 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.
दीपक नायट्रेट बाबत सकारात्मक बातमी
काल या स्टॉकमध्ये इतकी जबरदस्त तेजी एका सकारात्मक बातमीमुळे आली होती. ‘दीपक नायट्रेट’ कंपनीने गुजरात सरकारसोबत एक व्यापारी करार केला आहे. या करारात कंपनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी ‘दीपक नायट्रेट’ कंपनीचे शेअर्स 2.80 टक्के घसरणीसह 2,075.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सविस्तर करार तपशील :
‘दीपक केम टेक’ या ‘दीपक नायट्रेट’ च्या उपकंपनीने गुजरात सरकारसोबत एक व्यापारी करार केला आहे. त्यामुळे दीपक नायट्रेटच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. दीपक केम टेक ही कंपनी विशेष रसायनांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी पुढील चार वर्षांत गुजरात राज्यात 5,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
या उद्देशाने ‘दीपक नायट्रेट’ कंपनीने गुजरात सरकारसोबत MOU केला आहे. ‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे गुजरात राज्यात 1,500 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.
गुंतवणूकीवर परतावा :
‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 2011 मध्ये या कंपनीचे शेअर्स 15 रुपयेवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 2,075.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 12 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 12000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने 760 टक्के आणि तीन वर्षात 330 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,355.55 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.