Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! इंडियन हॉटेल्स शेअरने 3 वर्षात दिला 467 टक्के परतावा, आता नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेणार?

Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरने नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 389.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

यासह इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सनी नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 207.25 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 381.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1 वर्षांत 70 टक्के परतावा :
इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 73.14 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 221.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 25 मे 2023 रोजी 389.20 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 4 महिन्यांत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 11.92 टक्के वाढले आहेत.

3 वर्षात दिला 467 टक्के परतावा :
इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 467 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 67.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 26 मे 2023 रोजी 381 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.81 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Hotels Share Price today on 26 May 2023.