14 December 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

Zomato Share Price | झोमॅटोच्या 78% स्टॉकचा लॉक-इन कालावधी संपला, शेअरच्या किमतीत मोठ्या घसरणीची भीती

Zomato share price

Zomato Share Price | IPO आल्यापासून आणि त्याची लिस्टिंग झाल्यावर सतत धडपड करत नुसता पडणारा स्टॉक म्हणजे ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस झोमॅटो. ताज्या बातमीनुसार झोमॅटोच्या 78 टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी पुढील आठवड्यात संपणार आहे. शेअर बाजार विश्लेषकांना चिंता वाटत आहे की, कंपनीच्या शेअर्सवर विक्रीचा प्रचंड दबाव वाढू शकतो, आणि असे झाल्यास, स्टॉक सध्याच्या पातळीपासून तुटून आणखी पडेल आणि गुंतवणूकदारांना जबर तोटा सहन करावा लागेल.

ठळक मुद्दे:
* झोमॅटोच्या 78 टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी पुढील आठवड्यात संपत आहे.
* अँकर गुंतवणूकदारांनी लॉक-इन कालावधी संपवले तेव्हा एका दिवसात स्टॉक 8 टक्क्यांनी घसरला होता.
* झोमॅटोची IPO लिस्टिंग 76 रुपये प्रती शेअर होती.

आता एक नवीन धक्का बसणार?
बाजारात सतत काही ना काही घडामोडी होत असतात, गुंतवणूकदारांना धक्का देण्याची एकही संधी शेअर बाजार सोडत नाही. आता एक नवीन धक्का गुंतवणूकदारांना बसणार आहे तो म्हणजे झोमॅटोच्या 78 टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी पुढील आठवड्यात संपत आहे अशी माहिती भेटल्यावर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत कंपनीच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव निर्माण होण्याची भीती विश्लेषक व्यक्त करत आहेत. असे झाल्यास, स्टॉक सध्याच्या पातळीपासून तुटून आणखी खाली जाईल. आज मंगळवारच्या बंदमध्ये, झोमॅटोचा स्टॉक NSE वर 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 53.95 रुपयांवर बंद झाला, पण तो कालचा दिवसाचा उच्चांक मोडू शकला नाही.

लॉक-इन कालावधी :
आम्ही इथे स्पष्ट करू इच्छितो की लॉक-इन कालावधी ठराविक गुंतवणूकदारांसाठी आहे. जेव्हा जेव्हा स्टॉकच्या मोठ्या टक्केवारीचे लॉक-इन कालबाह्य होते तेव्हा ते गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकुन बाहेर पडू शकतात. त्यापूर्वी ते त्यांचे शेअर्स विकू शकत नाहीत असे बंधन त्यांच्यावर असते. अशा परिस्थितीत जर ह्या गुंतवणूकदारांनी लॉक-इन असलेले शेअर विकायला सुरुवात केली तर स्टॉक मध्ये मोठी घसरण होऊ शकते. पण गुंतवणूकदारांनी त्यांचे शेअर्स विकलेच पाहिजेत असे नाही, ते होल्ड करून ठेवू शकतात.

किंमतीवर वाईट परिणाम होऊ शकतो :
मनीकंट्रोलमधील एका बातमीनुसार, “या कंपनीत कोणीही प्रमोटर नाही. कंपनी मध्ये संस्थापकांसह सर्व शेअरधारकांचा एकूण 77.87 टक्के हिस्सा आहे. 23 जुलै 2022 रोजी लॉक-इन कालावधी संपल्यानंतर हे सर्व शेअरधारक त्यांचे शेअर्स विकण्यास मोकळे असतील, आणि त्यांच्यावर कोणतेही बंधन असणार नाही. त्यांना काहीही उघड करण्याची गरज नाही. याचा शेअरच्या किमतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.” जेव्हा अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉक-इन कालावधी संपला, तेव्हा केवळ एका दिवसात स्टॉक 8 टक्क्यांनी घसरला होता.

शेअर प्राईस खाली जाण्याची शक्यता आहे :
इक्वोनॉमिक्स रिसर्च अँड अॅडव्हायझरीग्रामचे तज्ज्ञ म्हणाले की “किरकोळ लहान गुंतवणूकदारांसाठी हे पाहणे महत्त्वाचे आहे की पीई/व्हीसी गुंतवणूकदार किती नुकसानीत आले आहेत. जर झोमॅटोच्या शेअर्सची त्यांची खरेदी किंमत सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा खूपच कमी असेल, तर सध्याच्या मंदीच्या परिस्थितीत त्यांना बाजारात शेअर विकून नफा काढून घ्यायला नक्कीच आवडेल.” “बर्‍याच गुंतवणूकदारांसाठी शेअर्स खरेदीची किंमत खूपच कमी असल्याने त्यांना नफा काढून घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे 23 जुलैनंतर स्टॉक खाली जाण्याची शक्यता जास्त आहे” असे तज्ज्ञ म्हणाले.

IPO लिस्टिंग 76 रुपये प्रति शेअर :
23 जुलै 2021 रोजी Zomato चा स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाला आणि ट्रेडिंग ला सुरुवात झाली होती. zomato ची लिस्टिंग खूप चांगली झाली होती. झोमॅटोने IPO मध्ये गुंतवणूकदारांना 76 रुपये प्रती शेअर्स प्रमाणे वाटप केले . कंपनीचा शेअर बीएसईवर 51 टक्के प्रीमियमसह म्हणजे 51% वाढीसह 115 रुपये प्रती शेअर वर लिस्ट झाला. बंपर सुरुवात होऊनदेखील शेअर्समध्ये तेजीचा कल जास्त काळ कायम राहिला नाही. बीएसईवर शेअर 169 रुपयांच्या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला होता. त्यावेळी कंपनीच्या मार्केट कॅपने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Zomato Share Price lock in period expired as on 20 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x