16 June 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

Stocks in Focus | अदानी ग्रुपच्या शेअर्सपेक्षा अधिक वेगाने परतावा देत आहेत हे शेअर्स, एका आठवड्यात 61 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत

Highlights:

  • Stocks in Focus
  • अदानी एंटरप्रायझेस शेअर
  • अदानी विल्मार शेअर
  • अदानी टोटल गॅस शेअर
  • इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्स, अरहम टेक्नॉलॉजीज आणि रेफेक्स इंडस्टीज कंपनी शेअर्स
  • डिक्सन टेक आणि अल्जी इक्विपमेंट्स कंपनीचे शेअर्स
Stocks in Focus

Stocks in Focus | मागील एका आठवडाभरात अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स गगन भरारी घेत होते. अदानी एंटरप्रायझेस या कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते, यासोबत डिक्सन टेक कंपनीचे शेअर्स देखील मजबूत वाढत होते. या आठवड्यात लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यानी चांगली कामगिरी केली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात 1890 रुपयांवरून वाढून 2537.45 रुपयेवर पोहचले आहेत.

अदानी एंटरप्रायझेस शेअर

मागील पाच दिवसांच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 34 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. यासोबत डिक्सन टेक कंपनीचे शेअर्स 2983.70 रुपयांवरून 20 टक्क्यांनी वाढून 3597.85 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

अदानी विल्मार शेअर

मागील एका आठवड्यात अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स वाढीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या कालावधीत अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 19.59 टक्क्यांच्या वाढीसह 378 रुपयांवरून 452 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

अदानी टोटल गॅस शेअर

वाढीच्या बाबतीत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स चौथ्या क्रमांकावर आहेत. एका आठवड्यात हा स्टॉक 666.65 रुपयेवरून 19.46 टक्क्यांनी वाढून 796.40 रुपये किमतीवर पोहोचला आहे.

मागील एका आठवडाभरात अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेस, अदानी विल्मर, अदानी गॅस, कंपन्यांनी लार्ज कॅप स्टॉकवर वर्चस्व गाजवले आहे. अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 18.65 टक्के, अदानी पॉवर स्टॉक 15.15 टक्के आणि अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स 12.79 टक्के वाढले आहेत.

इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्स, अरहम टेक्नॉलॉजीज आणि रेफेक्स इंडस्टीज कंपनी शेअर्स

मागील एका आठवड्यात काही स्मॉल कॅप स्टॉक मध्ये देखील तेजी पाहायला मिळाली आहे. इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्स कंपनीने देखील गुंतवणुकदारांना 61 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात 202.15 रुपयांवरून 326.15 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत अरहम टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरने लोकांना 54.24 टक्के आणि रेफेक्स इंडस्टीज कंपनीच्या शेअरने लोकांना 45.17 टक्के परतावा कमावून दिला आहे.

डिक्सन टेक आणि अल्जी इक्विपमेंट्स कंपनीचे शेअर्स

तर दुसरीकडे डिक्सन टेक नंतर अल्जी इक्विपमेंट्स कंपनीचे शेअर्स देखील मजबूत धावले होते. या कंपनीच्या स्टॉकने अवघ्या एका आठवड्यात लोकांना 18.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर केन्स टेक्नॉलॉजी आणि सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने लोकांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus today on 27 May 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x