4 May 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

LIC Share Price | एलआयसी शेअर बाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअर परताव्याचा इतिहास सविस्तर वाचा

Highlights:

  • LIC Share Price
  • एलआयसी शेअरची टार्गेट प्राईस
  • एलआयसी स्टॉकबाबत तज्ञांचे मत
  • एलआयसी शेअर किंमत इतिहास
LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअर्सबाबत तज्ञ अजूनही उत्साही पाहायला मिळत आहेत. एलआयसी कंपनीचे शेअर जेव्हापासून शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते, तेव्हापासून गुंतवणूकदारांना दणका देत आहेत. मात्र बहुतेक तज्ञ लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त आहेत. शेअर बाजारातील एकूण 23 तज्ञांनी एलआयसी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

एलआयसी शेअरची टार्गेट प्राईस

शेअर बाजारातील तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या स्टॉकवर 785.55 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने देखील एलआयसी स्टॉकसाठी 830 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच पुढील काळात एलआयसी कंपनीचे शेअर्स 830 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 0.050 टक्के वाढीसह 598.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एलआयसी स्टॉकबाबत तज्ञांचे मत

शेअर बाजारातील 15 तज्ञांनी एलआयसी स्टॉकबाबत आपले मत व्यक्त केले आहेत. त्यापैकी 9 तज्ञांनी एलआयसी स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 3 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही तज्ञांनी हा स्टॉक विकण्याचा सल्ला दिलेला नाही. पुढील 12 महिन्यांत एलआयसी कंपनीचे शेअर्स 75 टक्के वाढत होता. पुढील काळात हा स्टॉक 1045 रुपये किंमत स्पर्श करू शकतो असे तज्ञ म्हणाले.

मंदीच्या काळात हा स्टॉक 650 रुपये किंमत स्पर्श करू शकतो असे तज्ञ म्हणाले. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत एलआयसी कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा 96.50 टक्के होता. तर परकीय गुंतवणूकदारांचा वाटा 0.17 टक्केवरून 0.08 टक्क्यांवर आला आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांचे शेअर होल्डिंग प्रमाण 0.78 टक्के असून इतरांची शेअर होल्डिंग 2.64 टक्के आहे.

एलआयसी शेअर किंमत इतिहास

एलआयसी कंपनीचे शेअर्स 20 मे 2022 पासून आतापर्यंत 27 टक्क्यांनी खाली आले आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 23.23 टक्के कमजोर झाले आहेत. 2023 या वर्षात एलआयसी स्टॉक आतापर्यंत 15.88 टक्के कमजोर झाला आहे. मागील 6 महिन्यांत एलआयसी कंपनीचे शेअर्स 8.42 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 6.28 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 801.70 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 530.05 रुपये होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | LIC Share Price today on 07 June 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x