1 May 2024 1:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग IPO चर्चेत, गुंतवणूदारांना पहिल्याच दिवशी मजबूत परतावा मिळणार, ग्रे मार्केटमध्ये किंमत पहा

Highlights:

  • IKIO Lighting IPO 
  • शेअरची इश्यूची किंमत
  • ग्रे मार्केटमध्ये 90 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड
  • तज्ज्ञाची शिफारस
IKIO Lighting IPO

IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग या LED उत्पादने, फॅन रेग्युलेटर बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदार 6 ते 8 जून 2023 या कालावधीत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. या कंपनीच्या IPO स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच वेळी तज्ञांनी देखील या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे.

शेअरची इश्यूची किंमत

IKIO लाइटिंग सोल्युशन्स प्रोव्हायडर कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 270-285 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीने 52 शेअर्सचा एक लॉट जारी केला आहे. कंपनी आपल्या IPO अंतर्गत 350 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. यासोबत कंपनीचे प्रवर्तक हरदीप सिंग आणि सुरमीत कौर ऑफर फॉर सेल अंतर्गत 90 लाख इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत.

ही कंपनीला IPO द्वारे एकूण 606.5 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. IPO मधून मिळणारी पूर्ण रक्कम कंपनी कर्ज परतफेडीसाठी आणि IKIO सोल्युशन्सची सहायक युनिट स्थापन करण्यासाठी, आणि नोएडा उत्तर प्रदेशमध्ये नवीन कारखाना सुरू करण्यासाठी खर्च करणार आहे.

ग्रे मार्केटमध्ये 90 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड

IKIO लायटिंग कंपनीचे IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहेत. IPO Watch नुसार, IKIO Lighting कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 90 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरच्या अप्पर प्राइस बँडनुसार या कंपनीचे IPO शेअर्स 375 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

तज्ज्ञाची शिफारस

ब्रोकरेज फर्म आनंद राठी, चॉइस इक्विटी, सुशीला फायनान्स यांनी IKIO लायटिंग कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीकडे एक मजबूत व्यवसाय मॉडेल आहे. ही कंपनी आपल्या IPO मधून उभारलेली रक्कम व्यवसाय विस्तारामध्ये गुंतवणूक करणार आहे. नोएडा स्थित ही कंपनी 16 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. ही कंपनी मुख्यतः एलईडी उत्पादनांची रचना, विकास, निर्मिती आणि पुरवठा या संबंधित व्यवसाय करते.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IKIO Lighting IPO is opened on investment on 07 June 2023.

हॅशटॅग्स

#IKIO Lighting IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x