18 May 2024 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Capacite Infra Share Price| कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स शेअरने मागील एका महिन्यात 42. टक्के परतावा दिला, खरेदी करून फायदा घेणार?

Highlights:

  • Capacite Infra Share Price
  • मागील एका महिन्यात 42.57 टक्के परतावा दिला
  • कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 08 जून 2023 रोजी
  • कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनी ऑर्डर बुक
  • कंपनीच्या नफ्यात 95 टक्क्यांची वाढ
  • रेमंड रियल्टीकडून 224 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली
Capacite Infra Share Price

Capacite Infra Share Price | कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्रतिम तेजीत ट्रेड करत होते. कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 193.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मागील एका महिन्यात 42.57 टक्के परतावा दिला

यापूर्वी कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरने 13 सप्टेंबर 2022 रोजी 192.35 रुपये ही आपली सार्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 42.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 196.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 08 जून 2023 रोजी

कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 08 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी निधी उभारणीच्या प्रस्तावावर विचारमंथन करण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीला 2,100 कोटी ते 2,200 कोटी रुपये पर्यंतची ऑर्डर मिळण्याचा अंदाज आहे.

कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनी ऑर्डर बुक

31 मार्च 2023 पर्यंत कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे ऑर्डर बुकचे मूल्य स्टैंडअलोन आधारावर 9,513 कोटी रुपये एवढे आहे. एकूण ऑर्डर बुकमध्ये सार्वजनिक क्षेत्रातून मिळालेल्या ऑर्डरचा वाटा 70 टक्के असून खाजगी क्षेत्रातून मिळालेल्या ऑर्डरचा वाटा 30 टक्के आहे.

कंपनीच्या नफ्यात 95 टक्क्यांची वाढ

2022-23 या आर्थिक वर्षात कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या नफ्यात 95 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे ऑपरेशन्समधील महसूल 34 टक्क्यांच्या वाढीसह 1,791 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. EBITDA मार्जिन वार्षिक 290 bps वाढून 20.0 टक्के नोंदवली गेली आहे.

रेमंड रियल्टीकडून 224 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली

कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला नुकताच ठाण्यातील टेनएक्स एरा या निवासी प्रकल्पासाठी रेमंड रियल्टीकडून 224 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. एप्रिल 2023 मध्ये सीआयएल कंपनीला मुंबईमधे महालक्ष्मी जवळ निवासी टॉवर बांधण्यासाठी गोदरेज रेसिडेन्सी प्रायव्हेट लिमिटेडने देखील 478.08 कोटी रुपयांची ऑर्डर दिली होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Capacite Infra Share Price today on 07 June 2023.

हॅशटॅग्स

Capacite Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x