
Paytm Share Price | जेव्हापासून डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमचा स्टॉक बाजारात सूचीबद्ध झाला आहे, तेव्हापासून त्याने लोकांना निराश केले आहे. पेटीएम कंपनीचा स्टॉक ज्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता, त्या दिवशी कंपनीचे बाजार भांडवल 1.39 लाख कोटी रुपये होते 25 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे बाजार भांडवल कमी होऊन 30,198 कोटी रुपयांवर आले आहे. मागील काही महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांवर 80 टक्के तोटा लादला आहे. मात्र आता एक आनंदाची बातमी आली आहे. एका स्टॉक ब्रोकर कंपनीने आपल्या अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की, Paytm कंपनीचे शेअर्स आता त्याच्या खऱ्या बाजार भावावर आले आहेत. आता यापुढे Paytm कंपनीच्या शेअरसाठी मैदान मोकळे झाले आहे. इथून पुढे हा स्टॉक जबरदस्त तेजीत येऊ शकतो.
पेटीएम शेअरची किंमत :
25 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचा स्टॉक NSE निर्देशांकावर 465.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. काल हा स्टॉक 24 रुपयेच्या वाढीसह क्लोज झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची नीचांक किंमत पातळी 448.00 रुपये आहे. तर Paytm कंपनीच्या शेअर्सची उच्चांक किंमत पातळी 1,873.70 रुपये होती.
पेटीएमचा शेअर तेजीत येईल?
ग्लोबल रिसर्च फर्म सिटीने अंदाज व्यक्त केला आहे की, पेटीएम कंपनीचा स्टॉक लवकरच 1055 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. सध्याच्या बाजार भावापेक्षा हा स्टॉक 125 टक्के अधिक वाढेल. म्हणजेच पेटीएम कंपनीच्या शेअरची किंमत पुढील येणाऱ्या काळात दुप्पट होऊ शकते. Citi ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की पेटीएम कंपनीच्या पेमेंट व्यवसायाचे एंटरप्राइझ मूल्य नफ्याच्या आधारावर 13.5 पट आहे. शेअरची किंमत 466 रुपयेच्या जवळपास आहे, असा अंदाज Citi ने आपल्या अहवालात म्हंटले आहे. Paytm कंपनीच्या वित्तीय सेवा व्यवसायाचे मूल्य 375 रुपये प्रति शेअर आहे. याशिवाय, कॉमर्स आणि क्लाउड व्हर्टिकलचे मूल्य प्रति शेअर 81 रुपये होते. जर हे सर्व एकत्र केले तर पेटीएम कंपनीच्या शेअरची किंमत 1055 रुपये पर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, सिटीने असा विश्वास व्यक्त केला आहे की Paytm शेअरने बाजारातील तेजीला प्रतिसाद दिला तर हा स्टॉक 1230 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतो. दुसरीकडे, शेअर बाजारात जरी घसरणीला बळी पडला तरी हा स्टॉक 605 रुपये पर्यंत जाऊ शकतो. म्हणूनच तज्ञ म्हणतात की पेटीएम स्टॉक खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे.
पेटीएम शेअरचा इतिहास :
18 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचा IPO स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता. या कंपनीने IPO मधे शेअरची किंमत 2150 रुपये निश्चित केली होती. दुसरीकडे, पेटीएम कंपनीचा स्टॉक 1955 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. गमतीची गोष्ट अशी की, ज्यां दिवशी स्टॉक सूचीबद्ध झाला होता, त्याच दिवशी तो 27 टक्क्यांनी घसरून 1564 रुपयांवर पडला होता. सूचीबद्ध झाल्यापासून हा स्टॉक गुंतवणूकदारांचे पैसे बुडवत आहे. आता मात्र हा स्टॉक तेजीत येती शकतो, म्हणून तज्ञ हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.