27 March 2023 10:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही   Raymond Share Price | रेमंड शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा
x

Vikram Gokhale | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच निधन

Vikram Gokhale

Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना 15 दिवसांपासून या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण शनिवारी, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, मात्र शनिवारी प्रकृती बिघडली आणि त्यांचं निधन झालं. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सर्व टीव्ही आणि चित्रपट विश्वातील लोक अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीवर शोक व्यक्त करत आहेत. टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस फेम अली गोनी यांनी विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी कळताच ट्विटरवर त्यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “देव तुमच्या आत्म्याला शांती देवो सर”

अमिताभ बच्चन यांनी केलेली मदत
अभिनेते विक्रम गोखले यांना सुरुवातीच्या काळात मुंबईत खूप संघर्ष करावा लागला. त्यांच्यासमोर राहण्यात अडचण होती. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांना मदत केली होती. गोखले यांच्यासाठी बच्चन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पत्र लिहिले होते. याच आधारावर गोखले यांना मुंबईत सरकारी घर मिळाले. अमिताभ यांची मदत ते कधीच विसरले नव्हते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जेव्हा जेव्हा त्यांना आपल्या संघर्षमय दिवसांची आठवण यायची, तेव्हा तेव्हा ते या घटनेचा जरूर उल्लेख करायचे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vikram Gokhale passes away check details on 26 November 2022.

हॅशटॅग्स

#Vikram Gokhale(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x