5 May 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, स्टॉकमधून लोकांनी किती कमाई केली? जाणून घ्या

Highlights:

  • Suzlon Energy Share Price
  • तिमाहीच्या जबरदस्त निकालानंतर सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत
  • शेअरने मागील 5 दिवसांत 24.44 टक्के परतावा दिला
  • मागील 2 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. त्यामुळे सुझलॉन एनर्जीचे शेअर्स आता मुख्य चर्चेचा विषय बनले आहेत. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांच्या वधिसह 14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

तिमाहीच्या जबरदस्त निकालानंतर सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत

सुझलॉन एनर्जी ही जगातील 20 GW पवन ऊर्जा क्षमता प्राप्त करणारी पहिली भारतीय पवन ऊर्जा कंपनी बनली आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 14.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मार्च 2023 तिमाहीच्या जबरदस्त निकालानंतर सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तेजीत आले. सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण 1690 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि कंपनीने 320 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

शेअरने मागील 5 दिवसांत 24.44 टक्के परतावा दिला

2022-2023 या संपूर्ण आर्थिक वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीने 5947 कोटीं रुपये महसूल संकलित केला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील एका वर्षभरात 2900 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने आतापर्यंत जगभरात 12467 एंड एनर्जी इंस्टॉलेशन्स पूर्ण केले आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल देखील 14000 कोटी रुपये पोहोचले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 24.44 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 8.50 रुपये किमतीवरून 65 टक्क्यांनी वाढून 14 रुपयेवर पोहचले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 36.59 टक्के नगा मिळवून दिला आहे. 28 मार्च 2023 रोजी, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 2 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

मागील 2 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट झाले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीचे शेअर्स 350 टक्के वाढले आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Energy Share Price today on 09 June 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x